ITBP Viral Video : आपल्या देशाच्या लष्करावर (Indian Army) प्रत्येक भारताच्या मनात अफाट आदर आणि प्रेम आहे. अनेकदा सोशल मीडियावर सैनिकांचे व्हिडीओ पाहून प्रत्येकाच्या मनात देशप्रेम भरभरून येते. सैनिकांशी संबंधित व्हिडीओ पाहिल्यानंतर प्रत्येकाच्या मनात देशभक्ती दिसून येते. लष्कर आणि जवानांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. ITBP जवान म्हणजेच हिमवीरांचा असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Continues below advertisement


नुकताच असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर समोर आला आहे, जो पाहून सगळेच आश्चर्यचकित झाले आहेत. प्रो कबड्डी लीग स्पर्धेपासून भारतात कबड्डीची क्रेझ वाढली आहे. आता इंडो-तिबेट बॉर्डर पोलिसांच्या (ITBP) जवानांचंही कबड्डी प्रती प्रेम पाहायला मिळतंय. सैनिक शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी अनेक प्रकारचे खेळ खेळताना दिसतात. आता नुकत्याच समोर आलेल्या व्हिडीओमध्ये ITBP जवान कबड्डी खेळताना पाहायला मिळत आहेत. या व्हिडीओने सर्वांचं लक्ष वेधलं आहे, याच कारण म्हणजे हे हिमवीर बर्फाळ प्रदेशात एका टेकडीवर कबड्डी खेळताना दिसत आहेत.






व्हायरल व्हिडीओमध्ये आयटीबीपी जवान बर्फाच्छादित टेकडीवर कबड्डी खेळताना दिसत आहेत. ITBP च्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. हे सैनिक हिमाचल प्रदेशातील बर्फाच्छादित हिमालयात कबड्डी खेळत असल्याची माहिती कॅप्शनमध्ये देण्यात आली आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha