Health Tips : आपल्या शरीराचे सर्व अवयव आपल्यासाठी खूप महत्वाचे आहेत. हे सर्व अवयव केवळ आपल्याला निरोगी ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावत नाहीत तर आपल्या आरोग्याचं रहस्यही सांगतात. नखे (Nails) हा आपल्या शरीराचा एक महत्त्वाचा भाग आहे. मात्र, अनेकदा लोक त्याकडे दुर्लक्ष करतात. मुलींसाठी नखं म्हणजे एक प्रकारचे फॅशनचंच एक माध्यम तर इतरांसाठी नखं म्हणजे शरीरातील एक असा भाग ज्यामध्ये वेदना जाणवत नाहीत.
तसेच, याशिवाय आपली नखे आरोग्याशी संबंधित अनेक रहस्ये देखील सांगतात. जर नखे गुळगुळीत असतील आणि त्यांचा रंग हलका गुलाबी असेल तर समजा की तुमची नखं निरोगी आहेत. पण, जर नखांमध्ये काही बदल दिसले तर समजून घ्या की तुमच्या आरोग्यामध्ये काहीतरी गडबड आहे. नखांमध्ये दिसणारे असे काही बदल आहेत. हे बदल कोणते? ते जाणून घेऊयात.
नखांचा रंग उडणे
जर नखांचा रंग उडालेला असेल तर ते लोहाची कमतरता किंवा अशक्तपणाचे लक्षण असू शकते, ज्यामध्ये रक्त पुरेशा प्रमाणात ऑक्सिजन पुरवू शकत नाही.
पिवळी नखं
तुमची नखं पिवळी दिसणे ही फक्त एक कॉस्मेटिक समस्या नाही तर हे एका बुरशीजन्य संसर्गाचं लक्षण आहे.तुमची नखं जर पिवळी दिसत असतील तर समजा तुमच्यामध्ये पौष्टिकतेच्या कमतरतेचे लक्षण आहेत.तसेच,धूम्रपानामुळेही नखे पिवळी पडतात.
नखं निळी दिसणे
तुमची नखं निळी दिसणे गे एका गंभीर समस्येचं लक्षण असू शकतं. आपल्या नखांना पुरेशा प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा होत नसल्याचे हे लक्षण आहे. हे हृदय किंवा फुफ्फुसांशी संबंधित काही समस्यांशी संबंधित असू शकते.
नखांमध्ये खड्डे दिसणे
याला नेल पिटिंग असं देखील म्हणतात.या समस्येत नखांवर लहान खड्डे असू शकतात, जे दाहक संधिवातशी संबंधित असू शकतात. हा एक असा आजार आहे ज्याचा परिणाम तुमच्या हाडांवर आणि सांध्यांवर तर होतोच पण नखांवरही याचे पडसाद दिसतात.
कमकुवत नखं
जर तुमची नखं कमकुवत असतील तर तुम्हाला थायरॉईड असण्याची लक्षणं आहेत.यामुळे शरीरातील चयापचय आणि शरीराच्या इतर कार्यांवर परिणाम होऊ शकतो.
महत्त्वाच्या बातम्या :
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.