Hair Care Tips : सुंदर, आकर्षक आणि घनदाट केस असावेत असं प्रत्येक मुलीला वाटतं. यासाठी अनेक मुली हेअर कलर करतात, केस स्ट्रेट करतात. तसेच, केस स्मूदनिंगही करतात. केस (Hair Care Tips) आकर्षक दिसण्यासाठी सध्या हा ट्रेंड प्रत्येक मुलगी फॉलो करते. पण, स्टायलिंगच्या नादात अनेक मुली फॉलो करणाऱ्या या ट्रेंड्सबद्दल डॉक्टरांचं नेमकं म्हणणं काय आहे ते जाणून घेणं गरजेचं आहे. 


या संदर्भात डॉक्टरांचं असं म्हणणं आहे की, हेअर स्ट्रेटनिंग, हेअर स्मूदनिंग, हेअर कलर हे तुमच्या केसांसाठी घातक असू शकते. यामुळे तुमचा लूक जरी बदलत असला तरी मात्र हे तुमच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे. कारण, यात अनेक केमिकलयुक्त पदार्थांचा वापर केला जातो. यामुळे कर्करोगाचा धोका वाढू शकतो.  


कर्करोग वाढण्याचा धोका 


हेअर कलर आणि हेअर स्मूदनिंग करण्यासाठी यामध्ये अनेक केमिकलयुक्त पदार्थांचा वापर केला जातो. यामध्ये फॉर्मलडीहाइड आणि फॉर्मलडीहाइड असणारे प्रोडक्ट्स वापरले जातात. हेअर स्ट्रेटनिंग प्रोडक्ट्स वापरल्याने केस काही काळासाठी स्ट्रेट राहतात. पण, त्यामुळे तुमच्या केसांना अनेक प्रकारे धोका निर्माण होऊ शकतो. यामध्ये फॉर्मल्डिहाईड असते, ज्याच्या धुरामुळे डोळे, नाक आणि घशात जळजळ होते. यामध्ये तुम्हाला श्वासोच्छवासाशी संबंधित समस्या देखील निर्माण होऊ शकते. 


महिलांमध्ये 'या' कर्करोगाचा धोका वाढतो


जास्त केमिकलयुक्त हेअर प्रोडक्ट्स वापरल्याने महिलांमध्ये गर्भाशयाच्या कर्करोगाचा धोका सर्वाधिक वाढतो. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ (NIH रेकॉर्ड) नुसार, 2022 सालच्या रसायनांच्या वापरानंतर निघणाऱ्या धुरामुळे गर्भाशयाच्या कर्करोगाचा धोका वाढतो. खरंतर, हा कर्करोग तेव्हा होतो जेव्हा कर्करोगाच्या पेशी एंडोमेट्रियमच्या ऊतींमध्ये तयार होतात. जे गर्भाशयाच्या आत असते. फॉर्मल्डिहाईड या कर्करोगाच्या पेशींना चालना देते आणि शरीरात उत्परिवर्तनास प्रोत्साहन देते. 


हेअर कलरिंगमुळे मूत्राशयाचा कर्करोग होण्याचा धोका


Cancer.gov च्या ने केलेल्या संशोधनानुसार, हेअर कलरिंग केल्याने मूत्राशयाच्या कर्करोगाचा धोकाही वाढतो. सुमारे 80 टक्के केसांची ड्राय प्रोडक्ट्स हायड्रोजन पेरोक्साईडपासून बनवली जातात. ही सगळी प्रोडक्ट्स कर्करोगजन्य फॉर्म्युलेशन आहे. हे मूत्राशयातील कर्करोगाला प्रोत्साहन देतात. यासाठी हेअर कलरिंग करताना सावधानता बाळगणं गरजेचं आहे. 


महत्त्वाच्या बातम्या :


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


Winter Health Tips : हिवाळ्यात आजारांपासूनही दूर राहाल आणि रोगप्रतिकारकशक्तीही वाढेल; फक्त 'या' भाज्यांचा आहारात समावेश करा