Pakistan Tallest Building: दुबईत बांधलेली बुर्ज खलिफा (Burj Khalifa) ही इमारत जगातील सर्वात उंच इमारत आहे. हे आपल्याला माहितीच आहे. पण तुम्हाला माहित आहे का? पाकिस्तानमध्ये देखील अशीच एक उंच इमारत आहे. बहरिया आयकॉन टॉवर (Bahria Icon Tower) या इमारतीचं नाव आहे. या इमारतीची उंची नेमकी किती? ही इमारत तयार करायला किती वेळ लागला? याबाबतची सविस्तर माहिती पाहुयात.
जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफा बांधण्यासाठी सुमारे 12,500 कोटी रुपये खर्च करण्यात आला होता. त्याची उंची 828 मीटर आहे. तर पाकिस्तानच्या सर्वात उंच इमारत असलेल्या बहरिया आयकॉन टॉवरची उंची 300 मीटर आहे. हा टॉवर कराचीमध्ये बांधला आहे. त्याला पाकिस्तानचा बुर्ज खलिफा असेही म्हणतात. ही गगनचुंबी इमारत शहराच्या पॉश भागात शाहराह-ए-फिरदौसीमध्ये आहे. या इमारतीचे काम 2009 मध्ये सुरु करण्यात आले होते. 2017 साली या इमारतीचे बांधकाम पूर्ण झाले. बहरिया आयकॉन टॉवरमध्ये अनेक अपार्टमेंट आणि कॉर्पोरेट कार्यालये आहेत. त्यात काम करणाऱ्या लोकांसाठी आणि इतरांसाठी त्याच्या शेजारी आणखी 42 मजली टॉवर बांधण्यात आला आहे.
आशियातील दुसरी सर्वात उंच इमारत
पाकिस्तानातील कराचीमध्ये बांधलेल्या बहरिया आयकॉन टॉवरची उंची 300 मीटर आहे. यात 62 मजले आहेत. बहरिया आयकॉन टॉवरची उंची 300 मीटर म्हणजे अंदाजे 980 फूट आहे. आत्तापर्यंत ही दक्षिण आशियातील दुसरी सर्वात उंच इमारत आहे. त्याला लागून आणखी एक इमारत आहे, जी 42 मजली आहे. त्याचीही मालकी बहरिया टाऊन ग्रुपकडे आहे.
बहरिया आयकॉन टॉवरच्या बांधकामासाठी किती खर्च?
बहरिया आयकॉन टॉवरचे बांधकाम 2009 मध्ये सुरू झाले. ते 2017 मध्ये पूर्ण झाले. अहवालानुसार, ते तयार करण्यासाठी 162.5 दशलक्ष डॉलर खर्च आला. भारतीय रुपयात पाहिल्यास त्याची किंमत सुमारे 1400 कोटी रुपये आहे. समुद्रकिनारी स्थित बहरिया आयकॉन टॉवर बहरिया टाऊन ग्रुपने बांधला आहे. परंतू, त्याची योजना, रचना म्हणजेच संपूर्ण वास्तुविशारद अर्शद शाहिद अब्दुल्ला लिमिटेडकडे आहे. ज्यांचे अध्यक्ष शाहिद अब्दुल्ला आहेत.
बहरिया आयकॉन टॉवर बुर्ज खलिफाइतका उंच नाही
पाकिस्तानचा बहरिया आयकॉन टॉवर बुर्ज खलिफाइतका उंच नाही. बुर्ज खलिफा ही सर्वात उंच अमारत आहे. ज्याची उंची अंदाजे 828 मीटर आहे. तो बनवताना कधी भूकंप झाला तर नुकसान होणार नाही याची विशेष काळजी घेण्यात आली आहे. ही इमारत 7.0 रिश्टर स्केलपर्यंतच्या तीव्र भूकंपांनाही तोंड देऊ शकते. बुर्ज खलिफा आजूबाजूच्या इमारतींशी जोडण्यात आला आहे. जेणेकरून ऑनलाइन अलर्ट प्रणाली सुधारता येईल.
महत्त्वाच्या बातम्या: