Health Tips : शरीर सक्रिय आणि निरोगी ठेवण्यासाठी ऊर्जा खूप महत्त्वाची आहे. शरीरात पुरेशी उर्जा असेल तर आपण सर्व कामे करू शकतो. दुसरीकडे, जर ऊर्जा पातळी कमी झाली, तर आपल्याला थकवा जाणवतो. अनेकवेळा अचानक शरीरातील एनर्जी लेव्हल कमी होते आणि कोणतेही काम करावेसे वाटत नाही. कारण आपल्या शरीरात पोषक तत्वांची कमतरता असते, ज्यामुळे अशक्तपणा आणि थकवा येतो. अनेक वेळा अति शारीरिक हालचालींमुळेही आपल्याला थकवा जाणवतो.
दिवसभर शरीर निरोगी आणि ऊर्जा पातळी टिकवून ठेवण्यासाठी आपण आहारात काही पदार्थांचा समावेश केला पाहिजे. काम करताना किंवा धावपळीत थकवा जाणवत असेल तर झटपट ऊर्जा मिळविण्यासाठी या 5 गोष्टींचे सेवन करा.
1. बदाम खा : बदामामध्ये भरपूर मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन बी असते ज्यामुळे शरीरात ऊर्जा टिकून राहते. झटपट एनर्जीसाठी बदाम उत्तम मानले जाते.
2. केळी : झटपट ऊर्जा मिळवण्यासाठी तुम्ही तुमच्या आहारात केळीचा समावेश करू शकता. तुम्ही मुलाच्या टिफिन बॉक्समध्ये किंवा ऑफिसला जाणार्या व्यक्तीच्या जेवणाच्या डब्यातही केळी देऊ शकता. जेव्हा तुम्हाला थकवा जाणवतो तेव्हा केळी खा, यामुळे तुमची एनर्जी लेव्हल लगेच वाढेल. केळीमध्ये व्हिटॅमिन बी, फायबर आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते.
3. हर्बल चहा किंवा कॉफी प्या : शरीराला झटपट ऊर्जा मिळवण्यासाठी तुम्ही हर्बल चहा किंवा कॉफीचे सेवन करू शकता. वास्तविक, कॉफीमध्ये कॅफिन आढळते जे तुम्हाला सतर्क करते.
4. लिंबूपाणी : जर तुम्हाला अचानक थकवा किंवा चक्कर येत असेल तर तुम्ही एक ग्लास लिंबू पाणी पिऊ शकता. लिंबाच्या पाण्यात चिमूटभर मीठ आणि साखरही टाकू शकता. यामुळे तुमच्या शरीरातील इलेक्ट्रोलाइटचे संतुलन राखले जाईल आणि तुम्हाला दिवसभर उत्साही वाटेल.
5. पाणी किंवा हंगामी फळं खा : काही वेळा पाणी कमी प्यायल्याने थकवा जाणवतो. पाणी हा ऊर्जा मिळवण्यासाठी चांगला स्त्रोत मानला जातो. याशिवाय हंगामी फळांचे सेवन करूनही तुम्ही झटपट ऊर्जा घेऊ शकता. हंगामी फळांमध्ये अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात आढळतात, जे जळजळ दूर करतात.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्त्वाच्या बातम्या :