एक्स्प्लोर

Health Tips : चुकूनही 'या' गोष्टी चहाबरोबर खाऊ नका; होऊ शकतात गंभीर परिणाम

Health Tips : चहाबरोबर खाल्लेल्या काही गोष्टींचा आपल्यावर वाईट परिणाम होतो. याकडे आपण सहज दुर्लक्ष करतो.

Health Tips : चहा प्यायला कोणाला आवडत नाही. बहुतेक लोकांची सकाळची सुरुवातच चहाने होते. काहींना चहा बिस्किटांबरोबर आवडतो तर काहींना स्नॅक्सबरोबर आवडतो. दिवसभराचा कामाचा थकवा दूर करण्यासाठी असो किंवा बिघडलेला मूड सुधारण्यासाठी चहा प्रत्येक समस्येवर रामबाण उपाय आहे. पण, तुम्हाला माहित आहे का की, प्रत्येक खाद्यपदार्थ चहाबरोबर खाणं योग्य नाही. 

चहा पिताना आपण अनेकदा या गोष्टीकडे दुर्लक्ष करतो की चहाबरोबर खाल्लेल्या काही गोष्टींचा आपल्यावर वाईट परिणाम होतो. तुमचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी तुम्ही काही पदार्थ चहाबरोबर खाणं तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं.   

1. लोहयुक्त पदार्थ : विशेषतः चहा पिताना हिरव्या पालेभाज्या, मसूर, धान्ये यांसारखे लोहयुक्त पदार्थ खाणे टाळावे. तज्ज्ञांच्या मते, चहामध्ये टॅनिन आणि ऑक्सलेट्स भरपूर प्रमाणात असतात, जे शरीराला या पदार्थांमधून लोह शोषण्यापासून रोखतात.

2. लिंबू : लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. मात्र, दुधाच्या चहाबरोबर लिंबाचं सेवन करणे योग्य नाही. जरी लिंबू चहा वजन कमी करण्यासाठी प्रसिद्ध आहे. पण चहाची पाने लिंबूमध्ये मिसळल्याने तुम्हाला जास्त अॅसिडिटी, ढेकर येणे आणि अॅसिड रिफ्लक्स सारख्या समस्या येऊ शकतात. लिंबू चहा सकाळी कधीही पिऊ नये. जर तुम्ही आधीच अॅसिडिटीच्या समस्येने त्रस्त असाल तर तुमच्यासाठी लेमन टी टाळणेच चांगले.

3. डाळींचं पीठ : चहा आणि पकोड्यांचे कॉम्बिनेशन कोणाला आवडत नाही. पावसाळा आला की लोकांच्या मनात सगळ्यात पहिली गोष्ट येते ती म्हणजे चहा आणि पकोडे खाणे. पण तुम्हाला माहित आहे का की कुरकुरीत किंवा चविष्ट पकोडे हा सर्वात हानिकारक खाद्यपदार्थांपैकी एक आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, बेसनाचे पीठ रक्तातील पोषकद्रव्ये शोषून घेण्यापासून रोखते. त्यामुळे पोटदुखी आणि बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवते.

4. थंड पदार्थ : आईस्क्रीमसारखे थंड पदार्थ चहाबरोबर कधीही खाऊ नयेत. हे पदार्थ पचन प्रक्रियेत अडथळा आणण्याचे काम करतात. वेगवेगळे तापमान असलेले अन्नपदार्थ खाणे किंवा पिणे यामुळे पचनक्रिया कमजोर होऊ शकते. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, गरम चहा प्यायल्यानंतर सुमारे 30 ते 45 मिनिटे थंड काहीही खाऊ नये.

5. हळद : हळद हा सर्वोत्तम आणि प्रभावी मसाला आहे, ज्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. हळद तुम्हाला निरोगी आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी खूप मदत करते. पण, हळद कोणत्याही प्रकारे चहामध्ये मिसळ्यास हानिकारक ठरू शकते. तज्ज्ञांच्या मते, चहामध्ये हळद मिसळल्याने अपचन आणि छातीत जळजळ होऊ शकते.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्त्वाच्या बातम्या :

Health Tips : गुलाबी थंडीत 'या' चहाने तुमच्या दिवसाची सुरुवात करा; प्रतिकारशक्ती वाढविण्याबरोबरच व्हायरलपासूनही संरक्षण मिळेल

महत्त्वाच्या बातम्या

Bhuleshwarcha Raja : मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात,आगमन मिरवणुकीत घडला प्रकार, तीन जण जखमी
मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत दुर्घटना, अपघातात तीन जण जखमी
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhuleshwarcha Raja : मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात,आगमन मिरवणुकीत घडला प्रकार, तीन जण जखमी
मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत दुर्घटना, अपघातात तीन जण जखमी
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
Embed widget