Anxiety Attacks : झपाट्याने बदलणाऱ्या जीवनशैलीचा (Lifestyle) परिणाम मानवी जीवनावर होतो. यामुळे अनेक लोकांना शारीरिक आणि मानसिक समस्यांचा सामना करावा लागतो. एंग्जायटी अटॅक ही अशीच एक मानसिक समस्या (Mental Health) आहे, ज्यामुळे आजकाल अनेक लोक त्रस्त आहेत. हा एक अतिशय सामान्य मानसिक विकार आहे. पण,जेव्हा जास्त चिंता वाटू लागते तेव्हा हे झटके, भीती आणि चिंतेचं रूप धारण करतात.

  


एंग्जायटीची अनेक लक्षणं आहेत. जसे की, स्नायूंचा ताण, अस्वस्थता, श्वास घेण्यास अडचण, एकांतपणा यांसारखी लक्षणं दिसतात. अशा वेळी एंग्जायटी अटॅकला तोंड देण्यासाठी आम्ही काही टिप्स दिल्या आहेत जे तुमच्यासाठी उपयुक्त ठरतील. 


श्वासोच्छवासाचे व्यायाम करा


जर तुम्हाला किंवा कोणत्याही व्यक्तीला एंग्जायटी अटॅक आला असेल तर या समस्येपासून सुटका मिळविण्यासाठी तुम्ही श्वासोच्छवासाचे व्यायाम करू शकता. अटॅकच्या दरम्यान आपल्या डोक्याला आणि शरीराला शांत करण्यासाठी दीर्घ श्वास घेणं हा एक प्रभावी मार्ग आहे. आपल्या नाकातून हळूहळू श्वास घेणे, काही सेकंदासाठी श्वास रोखणे आणि मुखावाटे श्वास सोडण्याने तुम्हाला एंग्जायटीपासून आराम मिळू शकतो. 


लक्षणे ओळखा


एंग्जायटी अटॅकचा सामना करण्यासाठी सर्वात आधी त्याची लक्षणं ओळखणं गरजेचं आहे. एंग्जायटी अटॅकमध्ये शारीरिक आणि भावनिक लक्षणे असू शकतात. यामध्ये हृदयाचे ठोके जलद गतीने वाढणे, घाम येणे, शरीर थरथर कापणे, धाप लागणे, नियंत्रण गमावण्याची भीती यांचा समावेश होतो.


नकारात्मक विचार काढून टाका


अनेकदा एखाद्या एंग्जायटी अटॅक दरम्यान एखाद्या व्यक्तीचे विचार तर्कहीन आणि नकारात्मक होऊ शकतात. अशा स्थितीत असे विचार तुम्हाला ट्रिगर करू शकतात. अशा वेळी या परिस्थितीला तोंड देण्यासाठी आपले लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करा. तसेच, तुम्हाला ज्या गोष्टीतून आनंद मिळेल अशा कामं करा.


रिलॅक्सेशन एक्टिव्हीटी करा


जर तुम्हाला एंग्जायटी अटॅकचा सामना करावा लागत असेल तर त्यापासून आराम मिळवण्यासाठी काही रिलॅक्सेशन एक्टिव्हीटी करा. यासाठी तुम्ही योगाभ्यास, शांत संगीत ऐकणे किंवा पुस्तक वाचणे यांसारख्या एक्टिव्हीटी करू शकता. तुम्ही डान्स देखील करू शकता किंवा व्यायाम देखील करू शकता. 


इतरांची मदत मागा


कोणत्याही परिस्थितीत स्वतःसाठी मदत किंवा समर्थन मागायला कधीही संकोच करू नका. जेव्हा एंग्जायटी अटॅक येतो तेव्हा, तुमचा विश्वास असलेल्या व्यक्तीची मदत घ्या. तुमच्या मित्र-मैत्रिणींशी, कुटुंबातील सदस्यांशी किंवा मानसिक आरोग्य तज्ज्ञांशी बोला जे तुम्हाला  मार्गदर्शन देऊ शकतात.


महत्त्वाच्या बातम्या :


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


Health Tips : 'हे' 6 संकेत दर्शवतात तुमचं हृदय निरोगी आहे; घाबरण्याची गरज नाही