Mumbai : मराठी अभिनेत्री नेहा पेंडसे (Neha Pendse) हिच्या घरात चोरट्याने चांगलाच धुमाकूळ घातलाय. नेहाच्या घरातून चोरट्याने 6 लाखांचा मुद्देमाल लंपास केलाय. या प्रकरणी तिच्या ड्रायव्हरने पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. वांद्रे (Bandra) येथे असणाऱ्या तिच्या घरातून हा मुद्देमाल लंपास करण्यात आलाय. ही घटना 28 डिसेंबर रोजी घडली. सोन्याच्या बांगड्या, हिरा बसवण्यात आलेली अंगठी अशी एकूण 6 लाखांची चोरी करण्यात आली आहे. या प्रकरणी नेहा पेंडसेच्या नोकरास पोलिसांकडून (Police) अटक करण्यात आलीये. 


नेहाचा ड्रायव्हर काय म्हणाला?


वांद्रे वेस्टमध्ये अभिनेत्री नेहा पेंडसे हिचे घर आहे. अरोटो बिल्डिंगच्या 23 व्या मजल्यावर तिचे निवासस्थान आहे. ड्रायव्हर रत्नेश झा याने याबाबत बोलताना म्हटले की, चोरी झालेल्या दागिन्यांची किंमत 6 लाख रुपये इतकी आहे. ही चोरी 28 डिसेंबरला झाली होती. सोन्याच्या बांगड्या आणि हिरा लावलेल्या अंगठीचा यामध्ये समावेश आहे. नेहाला हे दागिने विवाहप्रसंगी भेट मिळाले होते. नेहाचा पती शार्दुल यातील काही दागिने परिधान करत होता. 


शार्दुल घरी परतल्यानंतर नोकर सुमित कुमार सोलंकी याच्याकडे दागिने योग्य जागेवर ठेवण्यासाठी देत होता. घटना घडली तेव्हा सुमित सोलंकी बाहेर जाण्यााची तयारी करत होता. त्याच दिवशी दागिने लंपास झाल्याची माहिती नेहाच्या पतीला मिळाली. त्यामुळे नेहाच्या पतीने नोकर सुमित सोलंकीवर संशय घेतला होता. 


नेहा पेंडसेच्या नोकर अटकेत 


नेहाचा पती शार्दुल याने नोकर सुमितवर संशय व्यक्त केल्यानंतर पोलिसांनी त्याची चौकशी केली. यानंतर त्याला अटक करण्यात आली आहे. दरम्यान, दागिने अद्याप सापडलेले नाहीत, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. 


सध्या कोणत्या मालिकेत काय करत आहे नेहा?


'भाभी जी घर पर हैं!'या मालिकेतून अभनेत्री सौम्या टंडन बाहेर पडली. यानंतर गौरी मॅडम म्हणजेच अनिता मिश्राची भूमिका साकारण्यासाठी मराठी अभिनेत्री नेहा पेंडसे (Neha Pendse) हिने मालिकेत एंट्री घेतली. मात्र, तिने या शोमध्ये जास्त वेळ घालवला नाही. सध्या 'मे आई कम इन मैडम' या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नेहा पेंडसे ही सिनेसृष्टीत कायम चर्चेत असते. दरम्यान सध्या वेगळ्याच प्रकरणामुळे ती चर्चेत आलीये. अभिनेत्री नेहा पेंडसेच्या घरात चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय.


इतर महत्वाच्या बातम्या 


Viral Regional Songs : 'गुलाबी शरारा', 'जमाल कडू' ते 'बादल बरसा' भाषेच्या चौकटी मोडणाऱ्या गाण्यांना तरुणाईची पसंती