Health Tips : निरोगी हृदय (Healthy Heart) हे चांगल्या आणि आनंदी जीवनाचं प्रतीक मानलं जातं. तसंही म्हटलं जातं की जर तुम्हाला दीर्घ आणि निरोगी आयुष्य जगायचं असेल तर तुमचं हृदय (Heart) निरोगी असणं गरजेचं आहे. हृदयाच्या आरोग्यात छोटीशी जरी चूक असेल तरी ती तुम्हाला महागात पडू शकते. हिवाळ्यात (Winter Season) तर हृदयाची आणखी काळजी घ्यावी लागते.
याच कारणामुळे थंडीच्या दिवसांत हृदयविकाराचा झटका येण्याच्या (हार्ट अटॅकच्या) समस्या आणखी वेगाने वाढू लागतात. विशेषत: जे ज्येष्ठ व्यक्ती आहेत त्यांनी या दिवसांत हृदयाची काळजी घेणं फार गरजेचं आहे. या दिवसांत हृदयविकाराचा झटका फक्त हृदयविकाराने त्रस्त असलेल्य लोकांनाच येतो असे नाही. कधी कधी तंदुरुस्त आणि निरोगी व्यक्तीही याला बळी पडू शकते. अशा वेळी तुमचं हदय निरोगी आहे की नाही हे माहित असणं फार गरजेचं आहे.
हार्ट बीट्स योग्य असणे
तुमचं जर हार्ट बीट म्हणजेच हृदयाची गती जर योग्य असेल तर हे निरोगी हृदयाचं एक लक्षण आहे. विशेषत: जेव्हा तुम्ही विश्रांती घेत असता तेव्हा तुमच्या हृदयाची गती खूप महत्त्वाची असते. तज्ज्ञांच्या मते, विश्रांती करताना हृदयाची गती 60 ते 100 बीट्स प्रति मिनिट असावी. तसेच, हाच काऊंट कायम ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जर, नियमित तुमचं हार्ट बीट सारखं असेल तर समजून जा तुमचं हृदय निरोगी आहे.
श्वास घेण्यास त्रास न होणे
श्वास घेण्यास त्रास होणे हेसुद्धा हृदयविकाराशी संबंधित आहे. जर तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होत नसेल तर समजून जा की तुमचं हृदय निरोगी आहे. तसेच, वर्कआऊट करतानाही तुम्हाला श्वास घेण्यास त्रास होत नसेल तर हे निरोगी हृदयाचं संकेत आहे.
छातीत दुखत नसल्यास
जर तुम्हाला छातीत दुखत नसेल तर हे तुमच्या हृदयासाठी चांगलं लक्षण आहे. कारण छातीत दुखणे हा हृदयविकाराच्या झटक्याशी संबंधित आहे. जर, तुम्हाला अशी कोणतीही समस्या आली नसेल तर, तुमचे हृदय पूर्णपणे तंदुरुस्त आहे.
चांगली ऊर्जा पातळी
चांगली ऊर्जा पातळी तुमच्या हृदयाच्या स्थितीवर अवलंबून असते. जर तुमचे हृदय निरोगी असेल तर तुम्ही दिवसभर उत्साही राहाल आणि तुमची कामगिरीही चांगली होईल. निरोगी हृदय तुमच्या स्नायू आणि अवयवांसह शरीराच्या सर्व भागांमध्ये रक्तप्रवाह प्रदान करते. त्यामुळे तुमच्याकडे भरपूर ऊर्जा असणं गरजेचं आहे.
व्यायामानंतर चांगली रिकव्हरी होणं
तुमचं हृदय जर निरोगी असेल तर तुम्ही कोणतीही फिजिकल एक्टिव्हिटी करा तुम्हाला थकवा जाणवणार नाही. कारण जर तुमचं हृदय निरोगी असेल तर तुमच्या शरीराल ऑक्सिजन देखील व्यवस्थित पोहोचतो. तसेच, शरीरातील लॅक्टिक अॅसिड कमी होऊन तुमचा थकवा दूर होतो.
हदयाला निरोगी ठेवण्यासाठी खास टिप्स
- सकस आहार घ्या.
- शक्य तितक्या लवकर वजन कमी करा.
- शारीरिकदृष्टया तंदुरुस्त राहा.
महत्त्वाच्या बातम्या :
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.