(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Leg Pain : ऑफिसमध्ये पाय दुखण्याच्या त्रासाने तुम्हीही हैराण आहात? 'या' टिप्स तुमच्यासाठी फायदेशीर
Leg Pain : जर तुम्हालाही पायाच्या दुखण्याने त्रास होत असेल तर कामाच्या वेळेत तुमच्या बसण्याच्या स्थितीची काळजी घ्या.
Leg Pain : दिवसभरातील बराचसा वेळ आपला ऑफिसच्या कामात जातो. अशा वेळी 8-9 तासांची शिफ्ट पूर्ण करताना अनेक प्रकारच्या शारीरिक तसेच मानसिक समस्या उद्भवतात. पाय दुखणं ही देखील यापैकीच एक मोठी समस्या आहे. यामुळे कामात तर लक्ष लागच नाही पण पायांना (Leg Pain) देखील सूज येते. एवढेच नाही तर घरी गेल्यावरही हा त्रास काही कमी होत नाही. अशा वेळी जर तुम्ही सुद्धा ऑफिसमध्ये पायांच्या दुखण्याच्या समस्येने त्रस्त असाल तर हा लेख तुमच्यासाठीच आहे. येथे आम्ही तुम्हाला अशाच काही आसनांबद्दल सांगणार आहोत, ज्याचे पालन करून तुम्ही तुमच्या पायांच्या दुखण्यापासून आणि सूजपासूनही आराम मिळवू शकता.
अशा प्रकारे तुम्हाला पायदुखीपासून आराम मिळेल
जर तुम्हीही पायाच्या दुखण्याने त्रस्त होत असाल तर कामाच्या वेळेत तुमच्या बसण्याच्या स्थितीची काळजी घ्या. अशा प्रकारे बसा की, तुमच्या शरीराचा संपूर्ण भार तुमच्या शरीरावर जाणवणार नाही, म्हणजेच पाय ओलांडून बसू नका. यामुळे तुमच्या रक्ताभिसरणावर परिणाम होतो कारण पायांमध्ये पाण्याचे प्रमाण वाढते. याशिवाय, असे बसल्याने तुमच्या ऊतींमध्ये पाणी भरते आणि पायांना सूज येते.
बसताना 'ही' चूक करू नका
आपल्यापैकी अनेकांना खुर्चीवर पाय रोवून बसण्याची सवय असते. अशा स्थितीमुळे पायांच्या नसा दाबायला लागतात आणि रक्ताभिसरण प्रक्रिया थांबते. अशा स्थितीत तुमचे पाय पुन्हा पुन्हा वाकतात हे तुम्ही अनेकदा पाहिले असेल. त्यामुळे दोन्ही पायांमध्ये चांगले अंतर ठेवून बसण्याची सवय लावा. यामुळे तुमच्या रक्तवाहिन्यांवर दबाव पडणार नाही.
पायांची स्थिती कशी ठेवावी?
- डेस्कची उंची तुमच्या खुर्चीएवढी असावी.
- तुम्ही खुर्ची किंवा डेस्क यांच्यातील अंतर समान असावं.
- तुमची पाठ तुमच्या खुर्चीला घट्ट असावी.
- खांदे वाकवून बसल्याने शरीरावर दबाव निर्माण होतो ज्याचा थेट परिणाम पायांवर होतो, त्यामुळे ते टाळा.
- पायांना सूज येत असेल तर फोमेंटेशन किंवा तेलाची मदत घ्या आणि पायांना मसाज करा.
या पद्धतीने जर तुम्ही तुमच्या पायांची काळजी घेतली तर तुम्हाला पायांचा त्रास जाणवणार नाही.
महत्त्वाच्या बातम्या :
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.