Health Tips : सध्या शरीरात  इम्युनिटी असणे आवश्यक आहे. जर तुम्हाला शरीरातील  इम्युनिटी वाढवायची असेल तर तुम्ही डाळिंब (Pomegranate) खाल्ल पाहिजे. डाळिंबाचा ज्यूस अनेकांना आवडतो. काही जण वर्क आऊट केल्यानंतर डाळिंबाचा ज्यूस पितात. डाळिंब खाल्ल्याने अनेक फायदे होतात.  डाळिंब या फळामध्ये अॅन्टीऑक्सिडंट, फायबर, व्हिटॅमिन्स, खनिज आणि फ्लेवोनोइड यांसारखी शरीराला आवश्यक असणारी पोषक तत्व असतात. शरीराच्या अनेक समस्या तसेच विविध आजारांवरही डाळिंबाचा ज्यूस गुणकारी ठरतो.


जाणून घेऊयात डाळिंब खाल्ल्याने होणारे फायदे
1.डाळिंबामुळे पचन शक्ती सुधारते.
2.प्रथिने, व्हिटॅमिन सी, फायबर, व्हिटॅमिन के, फोलेट आणि पोटॅशियम यांसारखे पोषक घटक डाळिंबामध्ये असतात. ज्यामुळे तुमच्या शरीरातील स्नायू मजबूत होतील 
3.शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढवण्यासाठी डाळिंब खूप उपयुक्त ठरते. 
4. डाळिंब खाल्ल्यानं  शरीराचा लठ्ठपणा कमी होतो आणि मधुमेहाची समस्या दूर होते. 
5. डाळिंबामुळे रक्तदाबाची समस्या दूर होते.


शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढवतं 


डाळिंबामध्ये अॅन्टीइंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. डाळिंबाचा ज्यूस शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी मदत करतो. तसेच आजारांपासून दूर ठेवण्यासाठीही मदत करतो. 


 व्हिटॅमिन सी 


दररोज शरीराला आवश्यक असणाऱ्या व्हिटॅमिन सीपेक्षा 40 टक्क्यांनी जास्त व्हिटॅमिन सी असतं. उच्च रक्तदाब आणि इतर हृदय रोगांपासून लढण्यासाठी व्हिटॅमिन सी अत्यंत आवश्यक असतं.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


संबंधित बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha