नांदेड : जिल्ह्यात गेल्या वर्षभरात हनी ट्रॅपच्या माध्यमातून अनेकांकडून खंडणी उकळून लाखो रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आलाय. परंतु, धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणी पोलिसांत अद्याप एकही गुन्हा दाखल करण्यात आला नाही.
फेसबुक, ट्वीटर, इन्स्टाग्रामवर सुंदर मुली आणि महिलांच्या फोटोंची प्रोफाईल तयार करून तरुण-तरुणींना गंडवण्याचा नवीन फंडा सायबर गुन्हेगारांनी सुरू केलाय. यातूनच नांदेड जिल्ह्यातील प्रतिष्ठित व्यक्तींना आणि तरूणांना लाखो रूपयांचा गंडा घातल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यातील अनेक राजकीय नेते, शासकीय अधिकारी, व्यापारी या हनी ट्रॅपमध्ये अडकले आहेत. परंतु बदनामीच्या भीतीने अद्याप कोणीही पोलिसात तक्रार दिली नाही.
अशी केली जाते फसवणूक
फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून सुंदर मुली आणि महिला संवाद साधतात. त्या दरम्यान चॅटिंग करणाऱ्या व्यक्तीस आक्षेपार्ह चॅटिंगसह व्हिडीओ कॉल केला जातो. त्यासाठी व्हिडीओ समस्या असल्याचे सांगून ती दूर करण्यासाठी एक अॅप डाउनलोड करण्यास सांगितले जाते. त्यांनंतर संबंधीत व्यक्तीच्या ओळखीच्या सर्व व्यक्तींचे नंबर आरोपी जवळ जातात व त्याचा तो गैरवापर करतो. याबरोबरच चॅटिंगमधून प्रेमाने बोलून नंतर मोबाईल कॉल व व्हिडीओ कॉल करून अश्लील संभाषण केले जाते. नंतर तोच व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन लाखो रुपयांची खंडणी उकळल्याचे प्रकार नांदेड जिल्ह्यात घडले आहेत.
नांदेड पोलिसांकडून आवाहन
दरम्यान, अशा हनी ट्रॅपमधून कुणाची फसवणूक झाली असेल तर त्यांनी पुढे येऊन तक्रार करावी असे आवाहन नांदेड पोलिसांकडून करण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या
- लैंगिक अत्याचाराची धमकी देऊन पैसे उकळणाऱ्या महिलेला अटक, बीड पोलिसांची कारवाई
- रिक्षाचे भाडे देण्यासाठी पैसे नसल्याने नेपाळहून आलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार, रिक्षा चालकासह तिघांना अटक, हडपसर परिसरातील धक्कादायक घटना
- Pune Crime : पाळत ठेवून तब्बल 30 घरफोड्या करणारा गुन्हेगार गजाआड, पुणे गुन्हे शाखेची कारवाई
- Pune : कुत्र्यावरुन शेजाऱ्यांमध्ये हाणामारी, वाद पोलीस ठाण्यात अन् तरुणीचा पोलिसांसमोरच गोंधळ