Health Tips : 'हे' पदार्थ रोज सकाळी रिकाम्या पोटी खा; आरोग्याच्या अनेक समस्या होतील दूर
Health Tips : जर तुम्ही सकाळच्या वेळी पौष्टिकतेने युक्त पदार्थ खाल्ले तर ते तुम्हाला निरोगी तर ठेवतातच पण दिवसभर ऊर्जावानही राहतात.
Health Tips : चांगल्या आरोग्यासाठी (Health) तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात चांगल्या सवयींनी करणं फार महत्वाचं आहे. रोजच्या व्यायामाबरोबरच जर हेल्दी फूड्स (Food) सकाळी घेतले तर तुम्ही अनेक आरोग्य समस्यांपासून सुरक्षित राहता. तुम्हीही निरोगी राहण्यासाठी तुमच्या आहारात अनेक प्रकारच्या पदार्थांचा समावेश केला पाहिजे. तुमच्या शरीराला कोणत्याही अन्नाच्या पौष्टिकतेचा पुरेपूर फायदा मिळण्यासाठी, तुम्ही ते योग्य वेळी खाणे महत्त्वाचे आहे. असे काही पदार्थ आहेत जे सकाळी रिकाम्या पोटी खाणे खूप फायदेशीर मानले जाते.
जर तुम्ही सकाळच्या वेळी पौष्टिकतेने युक्त पदार्थ खाल्ले तर ते तुम्हाला निरोगी तर ठेवतातच पण दिवसभर ऊर्जावानही राहतात. चला तर मग जाणून घेऊयात कोणते पदार्थ सकाळी रिकाम्या पोटी खाणे चांगले मानले जाते.
भिजवलेले काजू आणि ड्रायफ्रूट्स हा पौष्टिकतेचा खजिना
जर तुम्ही ड्रायफ्रूट्समध्ये बदाम, अक्रोड आणि मनुका यांसारखे काही ड्रायफ्रूट्स सकाळी रिकाम्या पोटी खाल्ले तर तुम्हाला तुमच्या आरोग्यासाठी अनेक फायदे होतात. याशिवाय चिया सीड्स, फ्लेक्स सीड्स इत्यादींमध्येही भरपूर पोषक घटक असतात. या सर्व गोष्टी रात्रभर भिजत ठेवून सकाळी खाल्ल्यास भरपूर फायदे मिळतात.
बडीशेपच्या पाण्याने सकाळची सुरुवात करा
ज्या लोकांना पचनाच्या समस्या आहेत त्यांनी सकाळची सुरुवात बडीशेपच्या पाण्याने करावी. यामुळे तुमची पचनक्रिया सुधारते आणि अपचन, गॅसमुळे होणारे पोटदुखी यापासून तुमचे संरक्षण होते. त्याचबरोबर सकाळी ताजेपणाही जाणवतो. यासाठी अर्धा चमचा बडीशेप एका ग्लास पाण्यात नीट उकळून घ्या आणि नंतर हे कोमट पाणी प्या.
पपईचं सेवन करा
सकाळी पपई खाणे देखील खूप फायदेशीर मानले जाते. व्हिटॅमिन सीने समृद्ध असलेले हे फळ केवळ रोगप्रतिकारक शक्तीच वाढवत नाही तर पचनाच्या समस्यांपासूनही आराम देते. बद्धकोष्ठतेचा त्रास असलेल्यांसाठी सकाळी रिकाम्या पोटी पपईचे सेवन करणे खूप फायदेशीर आहे.
केळी ऊर्जा देते
सकाळी रिकाम्या पोटी केळी खाणे हा देखील आरोग्याच्या दृष्टीकोनातून चांगला पर्याय आहे. हे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करते आणि ऊर्जा देखील वाढवते. केळी खाण्याचा फायदा असा आहे की, यामुळे तुमचे पोट भरलेले राहते.
महत्त्वाच्या बातम्या :
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.