एक्स्प्लोर

निवडणूक २०२४ एक्झिट पोल

(Source:  Dainik Bhaskar)

Health Tips : कोलेस्ट्रॉलपासून मुक्त व्हायचंय? तर, रोजच्या आहारात 'या' पदार्थांचा समावेश करा

Health Tips : रक्तातील अतिरिक्त कोलेस्ट्रॉलची वेळीच काळजी न घेतल्यास हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. म्हणून, आहाराकडे विशेष लक्ष दिले पाहिजे.

Health Tips : आजच्या काळात कोलेस्ट्रॉल (Cholesterol) हीदेखील एक सामान्य समस्या बनली आहे. कोलेस्ट्रॉलला हृदयाचा शत्रू म्हटले जाते. कोलेस्ट्रॉल हे हृदयाशी संबंधित आजारांना कारणीभूत असते. रक्तवाहिन्या आणि रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्टेरॉल जमा होऊन रक्ताभिसरणात अडथळा निर्माण होतो. यामुळेच आरोग्य तज्ज्ञ नेहमीच आहार आणि जीवनशैली सुधारण्याचा सल्ला देतात. रक्तातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण वेळीच लक्षात न घेतल्यास हृदयविकाराचा झटका येऊ शकतो, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. यामुळे मृत्यूही होऊ शकतो. म्हणून, आहाराकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. म्हणूनच वाईट कोलेस्ट्रॉल टाळण्यासाठी जंक फूडपासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो. चला तर जाणून घेऊयात की असे कोणते पदार्थ आहेत ज्यामध्ये कोलेस्ट्रॉल कमी आढळते आणि ते हृदयासाठी चांगले असू शकतात.
 
फायबर पदार्थ

हार्वर्ड हेल्थच्या अहवालात असे म्हटले आहे की, शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी अनेक पदार्थ उपयुक्त ठरू शकतात. जर विद्राव्य फायबर असलेल्या गोष्टी तुमच्या ताटात असतील तर पचनक्रिया चांगली होते आणि कोलेस्ट्रॉलची पातळी वाढत नाही.

वनस्पती आधारित अन्न

शरीरासाठी आवश्यक पोषक तत्त्वे वनस्पती-आधारित पदार्थांमध्ये आढळू शकतात. हे हृदय आणि नसा निरोगी ठेवण्यास मदत करू शकतात. त्यांचे सेवन हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले मानले जाते. 
 
योग्य स्वयंपाक तेल

खाद्यतेल योग्य असल्यास कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास मदत होतेच, पण रक्तातील साखरेचा धोकाही कमी होऊ शकतो. त्यामुळे जेवणात नेहमी आरोग्यदायी तेलाचा वापर करावा. लोणी आणि शुद्ध तेल आरोग्याला अनेक प्रकारे हानी पोहोचवू शकते. त्यामुळे रक्तातील कोलेस्ट्रॉल वाढण्याचा धोकाही असतो. कॅनोला, सूर्यफूल, ऑलिव्ह ऑईल यांसारखी तेल खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करू शकतात.
 
ड्रायफ्रूट्सचा वापर

बदाम, अक्रोड, शेंगदाणे आणि इतर सुका मेवा हृदयाच्या आरोग्यासाठी उत्तम असल्याचे अनेक अभ्यासातून दिसून आले आहे. दररोज मूठभर ड्रायफ्रूट्स खाल्ल्यास खराब कोलेस्ट्रॉल सुमारे 5% कमी होऊ शकतो. ड्रायफ्रूट्समध्ये अतिरिक्त पोषक घटक आढळतात जे हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात. त्यांचे सेवन केल्याने मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगले राहते.
 
फॅटी फिश

चरबीयुक्त मासे आठवड्यातून दोन किंवा तीन वेळा खाल्ले तर खराब कोलेस्ट्रॉल म्हणजेच LDL कोलेस्ट्रॉल कमी होऊ शकते. ओमेगा -3 फॅटी ऍसिडस् खराब कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी करून प्रदान केले जातात. हे मेंदूसाठी फायदेशीर मानले जाते. ओमेगा -3 रक्ताभिसरणातील ट्रायग्लिसराइड्स कमी करू शकते. हे हृदयाचे ठोके कमी करू शकते आणि हृदय मजबूत करू शकते.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 

महत्त्वाच्या बातम्या :

Health Tips : Weight Loss आणि Fat Loss मध्ये नेमका फरक काय? वजन कमी करण्याच्या 'या' 5 सामान्य चुका

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nitin Gadkari : नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
Marathi Language : मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
Mumbai Metro Line 3 : बीकेसी ते आरे मेट्रो लाईन 3 ला सुरुवात, तिकीट दर किती? स्टेशन कोणकोणते? वेळापत्रक एका क्लिकवर
बीकेसी ते आरे मेट्रो लाईन 3 ला सुरुवात, तिकीट दर किती? स्टेशन कोणकोणते? वेळापत्रक एका क्लिकवर
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

NIA Action Special Report :  NIAच्या महाराष्ट्रातील कारवाईचा ग्राऊंड झिरो रिपोर्ट एबीपी माझावरRangnath Pathare Majha Katta | अभिजात मराठी भाषा समितीचे अध्यक्ष  रंगनाथ पठारे माझा कट्टावरPM Narendra Modi Special Report : तिसऱ्या टप्प्यातील मेट्रोतून मोदींचा प्रवासJammu Kashmir Exit Poll : जम्मु- काश्मीर , हरियाणात भाजपला धक्का बसण्याची शक्यता

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nitin Gadkari : नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
नागपूरमध्ये विमानासारख्या सोयी असलेली बस सेवा, काय काय उपलब्ध असणार? नितीन गडकरींचं नवीन स्वप्न
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
पोलिस स्टेशन शांतता समितीचा सदस्यच निघाला नराधम, महिलेला भेटायला बोलवून केले लज्जास्पद चाळे 
Marathi Language : मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
मराठीचा इतिहास समृद्ध, अभिजात दर्जा मिळाल्याने मराठीजणांचे अभिनंदन : नरेंद्र मोदी
Mumbai Metro Line 3 : बीकेसी ते आरे मेट्रो लाईन 3 ला सुरुवात, तिकीट दर किती? स्टेशन कोणकोणते? वेळापत्रक एका क्लिकवर
बीकेसी ते आरे मेट्रो लाईन 3 ला सुरुवात, तिकीट दर किती? स्टेशन कोणकोणते? वेळापत्रक एका क्लिकवर
Metro Metro line 3 : बीकेसी ते आरे, मुंबई मेट्रो लाईन 3 चे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण; मेट्रोतून प्रवास करत विद्यार्थी, कामगार अन् महिलांशी संवाद
बीकेसी ते आरे, मुंबई मेट्रो लाईन 3 चे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते लोकार्पण; मेट्रोतून प्रवास करत विद्यार्थी, कामगार अन् महिलांशी संवाद
सध्या तरी अजितदादांसोबतच, फोनवरून उमेदवारी जाहीर झालेल्या आमदाराचे सूचक वक्तव्य; रामराजेंच्या भूमिकेवर सगळं ठरणार
सध्या तरी अजितदादांसोबतच, फोनवरून उमेदवारी जाहीर झालेल्या आमदाराचे सूचक वक्तव्य; रामराजेंच्या भूमिकेवर सगळं ठरणार
रस्त्यावर दहशत निर्माण करणाऱ्या टोळक्याला हटकलं, टवाळखोरांनी थेट पोलिसावर केला हल्ला, नाशिकमधील धक्कादायक घटना
रस्त्यावर दहशत निर्माण करणाऱ्या टोळक्याला हटकलं, टवाळखोरांनी थेट पोलिसावर केला हल्ला, नाशिकमधील धक्कादायक घटना
Sanjay Raut : शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना दिलं होतं गुंगीचं औषध, संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ, नेमकं काय म्हणाले?
शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना दिलं होतं गुंगीचं औषध, संजय राऊतांच्या दाव्याने खळबळ, नेमकं काय म्हणाले?
Embed widget