Health Care : जेवण झाल्यानंतर लगेच पाणी प्यायल्यानं अनेक समस्या होतात, असं तुम्ही ऐकलं असेल. कारण जेवणानंतर लगेच पाणी पिले की  डायजेस्टिव्ह ज्यूस  डायस्यूट होते आणि अन्न पचन व्यवस्थित होत नाही. अनेक एक्सपर्ट जेवल्यानंतर अर्धा तास पाणी न प्यायचा सल्ला देतात. तसेच जेवल्यानंतर लगेच थंड पाणी पिणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतं. पण कोमट पाणी तुम्ही पिऊ शकता. काही फळं किंवा पदार्थ खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये. 


केळी (Banana)
केळी खल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नका. केळी खल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायल्यानंतर पचन क्रिया बिघडूब शकते. त्यामुळे जर तुम्ही केळी खाल्ली तर त्यानंतर आर्धा तास पाणी पिऊ नका. अर्धा तास झाल्यानंतर तुम्ही पाणी पिऊ शकता. 


टरबूज  (Watermelon)
टरबूज या फळामध्ये 90-95 टक्के पाणी असते. टरबूज खाल्ल्यानंतर पाणी प्यायल्यानं  डाइजेस्टिव्ह ज्यूस डायल्यूट होते. त्यामुळे पोट दुखी होऊ शकते. तसेच तुम्हाला अपचन देखील होऊ शकते. 


दूध(Milk)
रोज सकाळी झोपायच्या आधी तसेच सकाळी उठल्यानंतर दूध प्यायची सवय अनेकांना असते. दूध प्यायल्यानंतर जर पाणी प्यायल्यानं मोटाबॉलिजम हळू होते तसेच अॅसिडीटी देखील होते.  


अंबट फळ (Citrus Fruits)
संत्री, मोसंबी आणि आवळा ही अंबट फळं खाल्ल्यानंतर पाणी पिऊ नका. कारण अंबट फळं खाल्ल्यानंतर शरीरातील पीएच बॅलेन्स बिघडतो. 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत. 


संबंधित बातम्या



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha