Beauty Tips : कोरफड या वनस्पतीला आयुर्वेदात खूप महत्त्व आहे. त्वचा तसेच पोटाशी संबंधित अनेक आजारांवर उपचार करण्यासाठी याचा वापर केला जातो. कोरफड शतकानुशतके त्वचेची काळजी घेण्याचा भाग आहे. कोरफडीच्या मदतीने तुम्ही घरी राहूनच त्वचेशी संबंधित अनेक समस्यांवर उपचार करू शकता. कोरफडीच्‍या स्‍पेशल इफेक्टबद्दल जाणून घ्या, जो तुमच्‍या त्वचेवर एका रात्रीत पाहायला मिळेल. तर जाणून घ्या रात्री एलोवेरा जेल लावून झोपल्यास काय होते.


त्वचेच्या पेशी त्वरित दुरुस्त होतात
एलोवेरा जेल चेहऱ्यावर आणि मानेवर रात्री लावून झोपल्याने त्वचा लगेच दुरुस्त होते. डेड स्किन जमा झाल्यामुळे रंगहीन झालेली त्वचा जेलमुळे खूप सुंदर आणि चमकदार दिसू लागते. कोरफड हे त्वचेत जाऊन आतून दुरुस्त करण्याचे काम करते.


त्वचेवरील छिद्र घट्ट करते
खुल्या छिद्रांमुळे त्वचेवर वय अधिक दिसून येते. त्वचेवरील छिद्रे जास्त वेळ उघडी राहिल्यास त्वचा सैल होते आणि त्यामुळे त्वचेवर सुरकुत्या वाढू शकतात. त्यामुळे वेळेवर त्वचेची योग्य काळजी घेणं खूप गरजेचं आहे.


त्वचेची चमक वाढते
तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी तुमच्या चेहऱ्यावर एलोवेरा जेल लावले तर फक्त एका रात्रीत तुमच्या त्वचेची चमक वाढते.


मुरुमांपासून सुटका
एलोवेरा जेलमध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात. रात्री झोपण्यापूर्वी चेहऱ्यावर एलोवेरा जेल लावा आणि रात्रभर असेच राहू द्या. यामुळे त्वचेवरील मुरुमांसोबतच मुरुमांचे डागही नाहीसे होतात.


एलोवेरा जेल लावायचे कसे?
झोपण्यापूर्वी चेहरा धुवा आणि स्वच्छ करा. यानंतर, एलोवेरा जेल किंवा कोरफडीचा गर चेहऱ्यावर लावा आणि हलक्या हातांनी मसाज करा. त्वचा जेल शोषून घेईल, त्यानंतर थोडे अधिक जेल घ्या आणि त्याचा त्वचेवर एक थर बनवा. नंतर झोपी जा. सकाळपर्यंत तुमच्या त्वचेची चमक अनेक पटींनी वाढेल.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


संबंधित बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha