Health Tips : मधुमेहाच्या (Diabetes) रुग्णांना अनेकदा रक्तातील साखरेची पातळी कशी नियंत्रित करायची याची चिंता असते. अनेकांना जेवणाची खूप आवड असते, पण या आजारामुळे त्यांना आपल्या आहारावर फार कंट्रोल करावा लागतो. मधुमेह अनुवांशिक (Genetic) आहे. मात्र, अनेक वेळा हा आजार खाण्याच्या चुकीच्या सवयी किंवा जीवनशैलीमुळे होतो. या आजाराने त्रस्त असलेल्यांनी खाण्यापिण्याची विशेष काळजी घ्यावी. कारण जर रक्तातील साखरेची पातळी सामान्यपेक्षा जास्त असेल तर ती देखील समस्या बनते आणि जर ती कमी असेल तर अनेक समस्या निर्माण होतात. म्हणूनच या आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांनी अजिबात दुर्लक्ष करू नये.
मधुमेहाचा त्रास असलेल्या लोकांनी फायबरयुक्त पदार्थांचे सेवन करावे. या ठिकाणी आम्ही तुम्हाला काही धान्यांबदद्ल सांगणार आहोत. ज्याचे सेवन करून तुम्ही तुमची वाढलेली साखरेची पातळी नियंत्रित करू शकता. याचा वापर नक्की करून पाहा.
नाचणी : नाचणी ही अतिशय पौष्टिक आहे. नाचणी दिसायला जरा मोहरीसारखी दिसते. नाचणी वाईट कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी खूप उपयुक्त आहे. याशिवाय मधुमेहाच्या रुग्णांसाठीही हे फायदेशीर आहे. नाचणीमध्ये अनेक पोषक घटक आढळतात. यामध्ये कोलेस्ट्रॉल आणि सोडियमचे प्रमाणही खूप कमी असते, ज्यामुळे हृदय निरोगी राहण्यास मदत होते.
बाजरी : बाजरीचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो. फायबरमध्ये भरपूर असल्याने, बद्धकोष्ठतेचा त्रास बरा करण्यासाठी आणि वजन कमी करण्यात खूप मदत होते. इतर धान्यांच्या तुलनेत बाजरीत लोहाचे प्रमाण अधिक असते. मधुमेहाच्या रुग्णांसाठीही हे खूप फायदेशीर आहे.
ज्वारी : ज्वारीमध्ये व्हिटॅमिन K1 भरपूर प्रमाणात असते, जे रक्त गोठण्यास आणि हाडांच्या विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. ज्वारीमध्ये असलेले बायोएक्टिव्ह फिनोलिक कंपाऊंड कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करते. तसेच रक्तातील साखरेची पातळी राखण्यास मदत होते. अशा प्रकारे तुम्ही सेवन केल्यास तुमचा बीपी नियंत्रि राखण्यास खूप मदत होईल.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्त्वाच्या बातम्या :