Happy New Year 2023: 31 डिसेंबरच्या रात्री घडाळ्याच्या काट्याने बाराचा आकडा गाठल्याबरोबर देशभरात नव्या वर्षाचे स्वागत करण्यात आलं. जल्लोषात, फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये भारतीयांनी नवीन वर्षाचे स्वागत केले. जम्मू काश्मीर ते कन्याकुमारी आणि महाराष्ट्र ते पश्चिम बंगाल संपूर्ण देशभरात नव्या वर्षाचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. नव्या वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटनस्थळावर गर्दी झाली आहे. त्याशिवाय अनेक जणांनी मंदिरात जाऊन 2022 वर्षाला निरोप दिला अन् नव्या वर्षासाठी नवा संकल्प केलाय.
मुंबई, पुणे, दिल्ली, मनाली, गोवा, कोलकाता, चेन्नईसह देशभरातील सर्वच शहरात नव्या वर्षाचं स्वागत जल्लोषात करण्यात आले. नागरिकांनी 2022 ला निरोप देत 2023 चं मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात स्वागत केलं. येथील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. या व्यतिरिक्त अनेक लोकांनी सन 2022 ची सर्व दु:खे विसरून नव्या वर्षाचे स्वागत केले.
महाराष्ट्रातही जल्लोषात स्वागत -
पुणे, मुंबई, नागपूरसह राज्यभरात नव्या वर्षाचं स्वागत करण्यात आले. मुंबईमध्ये ठिकठिकाणी लोक रस्त्यावर जमले होते. 12 वाजता मरीन ड्राईव्हवर आतषबाजी झाली अन् लोकांनी एकच जल्लोष करण्यास सुरुवात झाली होती.
पर्यटन स्थळ हाऊसफुल्ल -
2022 ला निरोप देण्यासाठी आणि 2023 च्या स्वागतासाठी अनेकांनी पर्यटनस्थळाला हजेरी लावली. लोणावळा, खंडाळा, माथेरान, कोकण, गोवा, मनाली, हिमाचलप्रदेश, जम्मू काश्मीर यासह विविध पर्यटन स्थळावर गर्दी उसळली होती. तीन वर्षानंतर कोरोनाचा जोर ओसरला आहे, त्यामुळे नागरिक नव्या वर्षाच्या स्वागतासाठी घराबाहेर पडले आहेत.
मंदिरामध्ये लोकांची गर्दी -
2022 वर्षाच्या अखेरच्या दिवशी अनेकांनी मंदिरात जाणं पसंत केलं. तुळजापूर, शिर्डी, पंढरपूर, कोल्हापूर यासह राज्यातील सर्वच मंदिरात गर्दी झाली होती. देवाचं दर्शन घेत अनेकांनी 2022 वर्षाला निरोप दिला.
मनालीमध्ये नव्या वर्षाचा उत्सव, लोकांनी केला तुफान डान्स
नव्या वर्षाचं स्वागतासाठी मनालीमध्ये गर्दी उसळली आहे. उत्साहात नव्या वर्षाचं स्वागत करत आहेत. हिमाचल प्रदेशमध्ये अनेक पर्यटक पोहोचले आहेत. मनालीमध्ये पर्यटकांनी जुन्या वर्षाला निरोप देताना अन् नव्या वर्षात पदार्पण करताना तुफान डान्स केला.
दिल्लीमध्ये इंडिया गेटसमोरही नागरिक मोठ्या प्रमाणात जमले होते.
गोव्यात डीजे नाईट -
गोव्यात नव्या वर्षाचा जल्लोषात स्वागत पाहायला मिळालं. 2023 च्या स्वागतासाठी गोव्यात लाखो पर्यटक पोहोचले. क्लब, पब आणि नाइट पार्ट्यांमध्ये मोठ्या संख्येने गर्दी झाली. लोकांनी आपापल्या पद्धतीने नव्या वर्षाचे स्वागत केले.
सोशल मीडियावर शुभेच्छांचा पूर -
31 डिसेंबरपासूनच सोशल मीडियावर नव्या वर्षाचा ट्रेंड सुरु झाला आहे. ट्वीटर, फेसबुक, व्हॉट्सअॅपसह इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर नेटकरी आपल्या जवळच्या व्यक्तींना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत आहेत. काहींनी आपल्या आठवणींचा कोलाजही पोस्ट केलाय. तर काहींनी 2023 मधील संकल्प सांगितलेत.
जगात सर्वात आधी कुठे नववर्षाचं स्वागत?
सामोआ, टोंगा, किरिबाती या देशात सर्वात आधी नव्या वर्षाचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर न्यूझीलंडमधील ऑकलँडमध्ये नववर्षाचं जल्लोषात स्वागत झालं. भारतीय प्रमाणवेळेपेक्षा साडेसात ते आठ तास पुढे असलेल्या देशांत नव्या वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आलं. या जल्लोषाचे व्हिडिओ ट्वीटरवर व्हायरल झालेत. फटाके वाजवत तेथील नागरिकांनी नव्या वर्षाचं स्वागत करत जल्लोष केला आहे. ऑकलंडमध्ये उंच टॉवरवरून फटाके फोडण्यात आले.
त्यानंतर ऑस्ट्रेलियामध्ये नववर्षाचं जल्लोषात स्वागत करण्यात आले. लोकांनी रस्त्यावर उतरुन नव्या वर्षाचं जल्लोषात स्वागत केलेय. दरम्यान, ऑस्ट्रेलियाची राजधानी सिडनीमध्ये नववर्षाचं जोरदार स्वागत करण्यात आलं. सुप्रसिद्ध सिडनी हार्बर ब्रिजवर यावेळी मोठी गर्दी जमली होती.
बारा वाजताच जल्लोषात नव्या वर्षाचं स्वागत -
न्यूझीलंडमधील ऑकलंडच्या स्काय टॉवरवर दरवर्षीप्रमाणे यंदाही नयनरम्य रोषणाई केली होती. या परिसरात जमलेल्या नागरिकांनी 2022 ला निरोप देत 2023 चं मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात स्वागत केलं. स्काय टॉवरवर लावलेल्या भल्यामोठ्या घड्याळामध्ये 12 वाजताच जोरदार आतषबाजी आणि सेलिब्रेशन सुरु झालं.