Cooked Vegetables VS Uncooked Vegetables : शरीरातील पौष्टिकतेची कमतरता दूर करण्यासाठी भाज्या हा सर्वात आरोग्यदायी पर्याय मानला जातो. मात्र, भाज्या कच्च्या खाल्याने जास्त फायदा होतो की शिजवून खाल्याने हा मुद्दा नेहमीच चर्चेचा असतो. बहुतेक भाज्या शिजवून खाल्ल्या जातात. तसेच, काही भाज्या देखील आहेत, ज्या सलाड म्हणून वापरल्या जातात, म्हणजेच कच्च्या खाल्ल्या जातात. काहींच्या मते, भाज्या शिजवणे हा त्यातील पोषक तत्वे मिळवण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. तर काहींच्या मते कच्च्या भाज्या खाणे आरोग्यासाठी अधिक फायदेशीर आहे.
बर्याच अभ्यासातून असे दिसून आले आहे की, कच्च्या खाण्यापेक्षा शिजवलेल्या भाज्या खाल्ल्याने आवश्यक पोषक घटकांचे प्रमाण वाढते. एवढेच नाही तर भाज्यांची चवही पूर्वीपेक्षा चांगली होते. भाजी शिजवण्यासाठी वाफवणे आणि तळणे हे उत्तम पर्याय असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. त्याच वेळी, काही अभ्यासातून असे देखील दिसते की, आपल्या स्वयंपाक करण्याच्या पद्धतीमुळे भाज्यांच्या पौष्टिक घटकांवर परिणाम होऊ शकतो. संशोधकांना असे आढळून आले की ब्रोकोली तळणे, मायक्रोवेव्हिंग करणे आणि उकळणे यामुळे क्लोरोफिल, विद्राव्य प्रथिने, साखर आणि व्हिटॅमिन सीचे प्रमाण कमी होऊ शकते. ब्रोकोली वाफवताना असे परिणाम दिसून येत नाहीत.
'या' भाज्या शिजल्यानंतर पौष्टिक होतात
1. पालक
पालेभाज्या पालकामध्ये भरपूर पोषक घटक असतात. ही भाजी शिजवून खाल्ल्यास जास्त कॅल्शियम आणि लोह मिळू शकते. कारण पालकामध्ये ऑक्सॅलिक ऍसिड असते, जे लोह आणि कॅल्शियमचे शोषण रोखते. पण शिजवल्यानंतर भाजीतून जास्तीत जास्त पोषक तत्वे मिळू शकतात.
2. टोमॅटो
बॅस्टिर युनिव्हर्सिटीच्या पोषण आणि व्यायाम विज्ञान विभागाच्या मते, टोमॅटो शिजवून खाल्ल्यास त्यातून व्हिटॅमिन सीचे प्रमाण कमी होते. 2002 मध्ये जर्नल ऑफ अॅग्रिकल्चरल अँड फूड केमिस्ट्रीमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात असे आढळून आले की शिजवलेल्या टोमॅटोमध्ये कच्च्या टोमॅटोपेक्षा लाइकोपीनची पातळी लक्षणीयरीत्या जास्त असते.
3. मशरूम
मशरूममध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात. कच्च्या मशरूमपेक्षा शिजवलेल्या मशरूममध्ये पोटॅशियम, नियासिन आणि झिंकचे प्रमाण जास्त असते.
4. गाजर
गाजरमध्ये कॅरोटीनॉइड बीटा-कॅरोटीन भरपूर प्रमाणात असते, ज्याचे शरीर व्हिटॅमिन ए मध्ये रूपांतरित करते. हाडांच्या वाढीस मदत करण्यात, दृष्टी वाढविण्यात आणि रोगप्रतिकारक शक्ती चांगल्या स्थितीत ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्त्वाच्या बातम्या :