Papaya Benefits For Health : दिवसाची सुरुवात आरोग्यदायी पद्धतीने करावी, ज्यामुळे तुम्ही दिवसभर उत्साही राहाल आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारची समस्या येणार नाही. चवीला गोड, शरीराला पोषक आणि त्वचेचे आरोग्य सुधारणारे फळ म्हणजे पपई. पपई शरीरासाठी गरम असल्याने वातावरणात गारवा असताना हे खाणे हितकारी आहे. जर रिकाम्या पोटी पपई खाल्ल्यास तुम्ही दिवसभर ऊर्जावान तर राहालच, शिवाय तुम्ही अनेक आजारांच्या धोक्यापासून स्वतःला दूर ठेवू शकता. रिकाम्या पोटी पपई खाण्याचे काय फायदे आहेत ते जाणून घेऊया.
सकाळी रिकाम्या पोटी पपई खाण्याचे फायदे
1. पपई व्हिटॅमिन सी आणि आवश्यक अँटिऑक्सिडंट्समध्ये समृद्ध आहे जे त्वचेचेसाठी उपयुक्त ठरू शकते. पपईमध्ये असलेले गुणधर्म त्वचेच्या पेशी दुरुस्त करण्यात आणि त्वचेचे संरक्षण करण्यास मदत करतात.
2. कोलेस्टेरॉल तुमच्या शरीराला विशेषतः तुमच्या हृदयाला अनेक प्रकारे नुकसान करू शकते. त्यामुळे कोलेस्टेरॉलचे प्रमाण नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे. पपईमध्ये असलेले फायबर कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते. याव्यतिरिक्त, पपईमध्ये असलेले पोटॅशियम उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते यामुळेही हृदयाला होणारी हानी कमी होते.
3. पपईमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात, ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. हे फळ खाल्ल्याने शरीराला संसर्ग आणि इतर आजारांपासून सुरक्षित ठेवता येते.
4. पपई वजन कमी करण्यास मदत करू शकते. या फळामध्ये कॅलरीजचे प्रमाण खूपच कमी असते, तर पपईमध्ये भरपूर फायबर असते, ज्यामुळे भूक नियंत्रित ठेवण्यास मदत करते आणि दीर्घकाळ भूकेवर नियंत्रण ठेवते. त्यामुळे, जर तुम्ही वजन कमी करण्याच्या प्रयत्न करत असाल, तर तुमच्या आहारात पपईचा नक्कीच समावेश करा.
5. पपई पचनप्रक्रियेत मदत करते. यामध्ये असलेले आहारातील फायबर्स अँटिऑक्सिडेंट चयापचय वाढवण्यास आणि अन्न पचण्यास मदत करतात. हे आतड्यांसंबंधी समस्यांपासून आराम मिळवण्यास मदत करते.
6. मधुमेहाच्या रुग्णांना सकाळी पपई खाल्ल्याने फायदा होतो. पपईमध्ये फायबरचे प्रमाण जास्त आणि साखरेचे प्रमाण कमी असते. फायबरमुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहण्यास मदत होते आणि शरीरातील ग्लुकोज नियंत्रणात राहते.
7. पपईमध्ये व्हिटामिन सी प्रमाणेच वेदनाशामक गुणधर्म असल्याने सांधेदुखीच्या रुग्णांना पपईचे सेवन फारच हितकारी आहे. पपईतील व्हिटामीन सी घटक सांध्यांना मजबुती देण्यास तसेच सूज कमी करण्यास मदत करतात.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
इतर महत्वाच्या बातम्या
Health Tips : फक्त दूधच नाही, पावसाळ्यात 'या' गोष्टी टाळा, नाहीतर...