Ajit Pawar Resigns : राजाच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा राजकीय भूकंप झाला आहे. अजित पवार यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला असून ते समर्थक आमदारांसह ते राजभवनावर पोहोचले आहेत. त्यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील मंत्रीही राजभवनात पोहोचले आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी आता राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पाडली आहे, हे जवळपास स्पष्ट झालं आहे. त्यांना जवळपास 30 आमदारांचा पाठिंबा असून त्यातील आमदारांच्या पाठिंब्यावर ते भाजपशी हातमिळवणी करण्यावर जवळपास शिक्कामोर्तब झाला आहे.
अजित पवार यांचा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा
राष्ट्रवादीचे 9 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची चर्चा रंगली आहे. त्याचबरोबर अजित पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकारावर अजून कोणीही थेट प्रतिक्रिया दिली नसली, तरी एकंदरीत राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजभवनात पोहोचताच माध्यमांनी गराडा घातला. त्यांना घडामोडींबाबत विचारले असता त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. 'मी पाहून सांगतो,' अशी मोजकीच प्रतिक्रिया त्यांनी दिली. त्यामुळे आज सायंकाळपर्यंत या राजकीय नाट्याचा काय शेवट असेल याचा अंदाज आहे.
अजित पवार राष्ट्रवादीत भूकंप करणार?
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रचंड अस्वस्थ असलेल्या अजित पवार, आज राष्ट्रवादीला हादरा देणार का, अशीही स्थिती आहे. आज सकाळपासून अजित पवारांच्या शासकीय निवासस्थानी राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक सुरु होती. अजित पवार यांच्याकडून हालचाली सुरु झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्यासोबत भाजपचे मंत्री राजभवनात दाखल झाले आहेत. त्यामुळे एकंदरीत आता अजित पवार हे स्वतंत्र गट घेऊन भाजपमध्ये सामील होणार की अन्य कोणती राजकीय घडामोड घडणार, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहिलं आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून अजित पवार अनेक विषयांमुळे चर्चेत आहेत. त्याचबरोबर काही वेळापूर्वीच शरद पवार यांनी शक्यता खोडून काढली होती. मात्र, आता थेट अजित पवारांची राजभवनाच्या दिशेने गेल्याने आजच राजकारणामध्ये मोठीच एखादी घडामोडी जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे 30 आमदारांसह अजित पवार हे भाजपमध्ये सामील होणार असल्याचं म्हटलं जात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या