Maharashtra Political Crisis : राज्याच्या राजकारणात भूकंप होण्याची शक्यता असून, अजित पवार (Ajit Pawar) उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. राजभवनात शपथविधीची जय्यत तयारी सुद्धा सुरु आहे. विशेष म्हणजे यावेळी राष्ट्रवादीचे 9 आमदार मंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामध्ये मराठवाड्यातून धनंजय मुंडे हे मंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचं समोर येत आहे. सध्या राजभवनात धनंजय मुंडे दाखल झाले आहेत. धनंजय मुंडे हे आधीपासूनच अजित पवारांचे समर्थक समजले जातात. तर पहाटेच्या शपथविधीच्या वेळी देखील धनंजय मुंडे अजित पवारांच्या सोबत गेले असल्याची जोरदार चर्चा होती.
Maharashtra Political Crisis : मराठवाड्यातून धनंजय मुंडे घेणार मंत्रीपदाची शपथ?; राजभवनात शपथविधीची जय्यत तयारी सुरु
एबीपी माझा वेब टीम | मोसीन शेख | 02 Jul 2023 02:14 PM (IST)
Ajit Pawar Update : पहाटेच्या शपथविधीच्या वेळी देखील धनंजय मुंडे अजित पवारांच्या सोबत गेले असल्याची जोरदार चर्चा होती.
Ajit Pawar Dhananjay Munde Maharashtra Political Crisis