Health Tips : हिवाळ्यात निरोगी राहण्यासाठी बहुतेक घरांमध्ये तुळशीचा वापर केला जातो. मुख्यतः चहामध्ये तुळशीची पानं (Basil Leaves) घातली जातात. तुळस ही एक औषधी वनस्पती आहे. औषधी गुणधर्मांसाठी तुळशीला अनन्य साधारण महत्त्व आहे. हिवाळ्यात तुळशीचा योग्य प्रकारे वापर केला तर जवळपास प्रत्येक हंगामी आजार टाळता येतात.
जगभरात पुन्हा एकदा कोरोनामुळे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चीनमधील वाढता कोरोना संसर्ग हे यामागील कारण आहे. अशा परिस्थितीत आपण आपली प्रतिकारशक्ती जपण्याची गरज आहे. निरोगी राहण्यासाठी तसेच रोगप्रतिकारकशक्ती मजबूत करण्यासाठी तुळशीची खूप मदत होते. तुळशीचे फायदे नेमके कोणते आणि तुळशीचा वापर कसा करावा ते जाणून घ्या.
तुळशीचे काय फायदे आहेत?
- तुळशीमुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढते.
- तुळशीचे सेवन केल्याने लवकर बरे वाटते. म्हणजे दुखापत झाली तर जखम लवकर भरते.
- तुळशीमध्ये वेदनाशामक गुणधर्म असतात, त्यामुळे तुळशीचे सेवन केल्याने वेदना कमी होतात.
- तुळस स्ट्रेस बस्टर म्हणून काम करते.
- तुळशीमध्ये बॅक्टेरियाविरोधी गुणधर्म असल्याने हिवाळ्यात जिवाणू आणि विषाणूंमुळे होणा-या रोगांपासून संरक्षण होते.
- सर्दी आणि खोकल्यामध्ये तुळस खूप फायदेशीर आहे.
- तुळशीचे सेवन केल्याने रक्तातील साखर संतुलित होण्यास मदत होते.
- तुळशीच्या सेवनाने पचनक्रिया सुधारते.
- या सर्वांसोबतच तुळशीमध्ये कॅन्सरविरोधी गुणधर्म आहेत.
तुळशीचा वापर कसा करावा?
- तुळस पाने, तेल, बिया आणि पावडरच्या स्वरूपात वापरता येते.
- बहुतेक भारतीय घरांमध्ये तुळशीचे रोप असते, त्यामुळे तुळशीची ताजी पाने अधिक वापरली जातात.
- चहामध्ये तुळशीच्या पानांचा वापर करावा आणि दिवसातून दोन वेळा या चहाचे सेवन करावे.
- जर तुम्हाला दुधाचा चहा प्यायला आवडत नसेल तर तुम्ही काळ्या चहामध्ये तुळस घालून वापरू शकता.
- खोकला-सर्दी-ताप, छातीत जड होणे किंवा अति सर्दी झाल्यास तुळशीचा पानांचे सेवन करावे.
- जेवणानंतर घशात कोणत्याही प्रकारची समस्या असल्यास तुळशीची पाने चावून खावीत.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्त्वाच्या बातम्या :