Kalyan-Dombivli Latest crime News Update: लोनसाठी विविध कंपन्यांमध्ये फोन येतो, मात्र अशा फोनपासून सावध रहा. कारण 30 लाख रुपये लोन देण्यासाठी डोंबिवतीलीक एका व्यक्तीकडून प्रोसेसिंग फीच्या नावाने चक्क साडे सात लाख रुपये उकळले गेले आहेत. आत्ता या  प्रकरणात मानपाडा पोलिसांनी अथक प्रयत्न करुन तीन राज्यातून तीन आरोपींना अटक केले आहे. साडे सात लाखाची रक्कम या आरोपींकडून हस्तगत करण्यात आली आहे. नमन गुप्ता या हिमाचल प्रदेशातून, आकाश कुमार चांदवानी याला दिल्लीतून आणि ऋषी सिंग याला नोऐडा येथून अटक केली आहे. या तिघांनी प्रोसेसिंग फिच्या नावाखाली अन्य किती लोकांना अशा प्रकारे गंडा घातला आहे. याचा तपास मानपाडा पोलिस करीत आहेत.


डोंबिवली राहणारे अनिल आव्हाड यांनी मानपाडा पोलिस ठाण्यात  त्यांना लोन देण्याच्या नावाखाली फसविले गेले असून तब्बल साडे सात लाख उकलल्याची तक्रार दिली .फोन करणार्या व्यक्तीने  तुम्हाला किती लोन पाहिजे आधी दहा लाख, नंतर वीस लाख आणि नंतर 30 लाख रुपयांचे लोन झिरो इंटरेस्टने काढून देण्याच्या नावाखाली आमिष दाखविले . प्रोसेसिंग फीच्या नावाखाली अनिल आव्हाड यांच्याकडून हळूहळू टप्याटप्पात सात लाख 35 हजार रुपये घेतले गेले.मात्र बराच कालावधी उलटून गेला लोन मंजूर न झाल्याने त्यांना आपली फसवणूक झाल्याचे अनिल यांच्या लक्षात आले  मात्र संबंधितांचा काही संपर्क होत नव्हता . या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झालीं व या प्रकरणाचा तपास डोंबिवलीचे एसीपी सुनिल कु:हाडे यांच्या मार्ग दर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरिक्षक शेखर बागडे यांनी सुरु केला. या तपासाची जबाबदारी मानपाडाचे एपीआय सुनिल तारमळे यांना दिली गेली. तारमळे यांच्या पथकाने तांत्रिक मुद्दय़ाच्या आधारे तपास सुरु झाला. अखेर आरोपींचा सुगावा लागला. सुनिल तारमळे यांच्या पथकाने हिमाचल प्रदेश, दिल्ली आणि उत्तर प्रदेशात जाऊन तिन्ही आरोपीना अटक केली आहे.


ॲानलाईन फसवणुकीचा आतापर्यंतचा सर्वात भयानक प्रकार आहे. यामध्ये  आर्थिक नुकसानीसोबतच मानसिक शोषण देखील या प्रकारात होत आहे.  ज्यामुळे अगदी आत्महत्या ते खून होण्यापर्यंत हे प्रकरण पुढे गेले आहे.  त्यामुळे तात्काळ मोबाईलवर कर्ज देतो असं कुणी सांगितलं  मेसेज केला तर त्यावर क्लिक करू नका, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. 


ही बातमी वाचायला विसरु नका :


Kolhapur News : सर्व घटकांना एकत्रित करण्याचा वारकरी संप्रदायाचा प्रयत्न, पण राजकीय पक्षांच्या अध्यात्मिक आघाड्यांमुळे प्रदूषण; शामसुंदर सोन्नर महाराजांनी कान टोचले