Health Tips : हिवाळ्याचा (Winter Season) काळ हा तो काळ असतो ज्यामध्ये बहुतांश सर्व लोक आजारी पडतात. याचं कारण म्हणजे वातावरणातील बदलांमुळे अनेकदा आपल्याला सर्दी, खोकला, ताप यांसारख्या आजारांचा समना करावा लागतो. जरी हे आजार काही दिवसांतच बरे होत असले तरी जर तुम्ही सतत आजारी पडत असाल किंवा वारंवार ताप, सर्दी, खोकला येत असेल तर याचा अर्थ तुमची रोगप्रतिकारकशक्ती (Immunity) कमकुवत झाली आहे असं समजा. तर, अशा वेळी तुमची प्रतिकारकशक्ती चांगली असणं गरजेचं आहे. या ठिकाणी आम्ही तुम्हाला अशा काही पाच पदार्थांची नावं सांगणार आहोत ज्यामुळे तुमची प्रतिकारकशक्ती कमी होते.
पुरेशी झोप घेणं
निरोगी शरीरासाठी पुरेशी झोप घेणं फार गरजेचं आहे. झोपेच्या दरम्यान आपलं शरीर प्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी शरीराला प्रोटीन पुरवते. याला सायटोकिन्स असं म्हणतात. संशोधनानुसार, कमी झोप घेतल्यामुळे तुमचे शरीर व्हायरस आणि किटाणुंच्या संदर्भात अति संवेदनशील होते. यातून बाहेर येण्यासाठी बराच काळ लागतो.
तणाव घेणे
एका संशोधनानुसार, जर तुम्ही तणाव घेत असाल तर फक्त 30 मिनिटांत तुमची प्रतिकारकशक्ती कमकुवत होते. यामुळे, कोणत्याही परिस्थितीत जास्त तणाव घेऊ नका. कारण, यामुळे थेट तुमच्या प्रतिकारकशक्तीवर परिणाम होतो.
व्हिटॅमिन डीची कमतरता
हिवाळ्याच्या दिवसांत उन्हातून व्हिटॅमिन डी शरीराला मिळणं फार कठीण होतं. पण, हे अशक्य नाही. एडिनबर्ग युनिव्हर्सिटीच्या संशोधनानुसार, व्हिटॅमिन डीची कमतरता शरीराला प्रतिकारकशक्ती पुरवण्याबरोबरच ती कमजोर करण्याचं देखील काम करते. यासाठी फक्त सकाळी उठल्यावर सूर्याची किरणंचं घेणं पुरेसे नाही. तर, याशिवाय तुम्ही अंडी, मांसाहारी पदार्थ, मासे यांपासून देखील शरीराला व्हिटॅमिन डी पुरवू शकता.
पालेभाज्या-फळांचं सेवन न करणे
शरीराला विविध आजारांवर मात करण्यासाठी व्हाईट ब्लड सेल्स असणं गरजेचं आहे. हे निर्माण करण्याचं काम फळं आणि पालेभाज्या करतात. हार्वर्ड टीएच स्कूल ऑफ पब्लिक हेल्थच्या म्हणण्यानुसार, एक किंवा त्याहून अधिक पोषक तत्वांची कमतरता असणारं डाएट रोगप्रतिकारकशक्ती आणि एन्टीबॉडीजच्या प्रोडक्शनल बिघडवण्याचं कार्य करते.
नियमित व्यायाम न करणे
हिवाळ्यात वातावरणात थंडावा असल्या कारणाने शरीरात आळस येतो. त्यामुळे अनेकदा व्यायाम न करणे, जिमला न जाणे, योगा न करणे असे अनेक प्रकार घडतात. संशोधनानुसार, जर तुम्ही नियमित व्यायाम केला नाही तर तुमची प्रतिकारकशक्ती कमकुवत होते. यासाठी रोज एरोबिक्स एक्सरसाीझ करा यामुळे शरीरात रक्ताभिसरण सुरळीत राहते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :
Joint Pain : थंडी वाढताच जुनं दुखणं डोकं वर काढतं, यामागचं खरं कारण माहित आहे का?