मुंबई : मी उपाध्यक्ष असताना जो निर्णय घेतला होता तो त्यावेळीची परिस्थिती आणि माझ्यासमोर ठेवलेल्या बाबी या पाहून घेतला होता. आता माझा त्या विषयाशी संबंध नाही. अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नरहरी झिरवाळ यांनी दिलीय. राज्याच्याच नव्हे तर देशाच्या राजकीय भवितव्यासाठी आजचा दिवस महत्वाचा ठरणार आहे. शिवसेना आमदार अपात्रता (MLA Disqualification Case) सुनावणीचा निर्णय जाहीर होत आहे.  तसेच  आजच्या निकालाचा आमच्या निकालावर परिणाम होईल असं वाटत नाही, असेही राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार नरहरी झिरवळ (Narhari Zirwal ) एबीपी माझाशी बोलताना म्हणाले.


नरहरी झिरवळ म्हणाले,मी उपाध्यक्ष असताना जो निर्णय घेतला होता तो त्यावेळीची परिस्थिती आणि माझ्यासमोर ठेवलेल्या बाबी या पाहून घेतला होता. आता माझा त्या विषयाशी संबंध नाही. आता निर्णय घेणारे हे स्वतः कायदे तज्ज्ञ आहेत आणि मला अपेक्षा आहे सर्व बाजू पाहूनच ते आजचा निर्णय घेतील. आमची आता लवकरच सुनावणी सुरू होणार आहे.  आमच्या बाबत असलेल्या फॅक्ट्स आणि सध्या सुनावणी असलेल्या फॅक्ट्स या कदाचित वेगवेगळ्या असू शकतील त्यामुळे आजच्या निकालाचा आमच्या निकालावर परिणाम होईल असं वाटत नाही.


अध्यक्षांच्या निर्णयावर मी कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया देणार नाही : झिरवाळ


अध्यक्षांच्या निर्णयावर बोलताना  आमदार  नरहरी झिरवळ म्हणाले की, अध्यक्षांच्या निर्णयावर मी कुठल्याही प्रकारची प्रतिक्रिया देणार नाही. शरद पवार काय म्हणाले तो त्यांचा विषय आहे मी आता त्याच्यावर बोलणं उचित ठरणार नाही. आता मी या गटामध्ये आहे. 


संपूर्ण देशाचे डोळे आजच्या निकालाकडे


महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचे डोळे आजच्या निकालाकडे लागले आहेत. प्रचंड धक्कादायकरित्या घडलेल्या या सत्तानाट्याने महाराष्ट्राचा राजकीय पटच बदलून टाकला.  उद्धव ठाकरेंना चेकमेट करून शिंदे मुख्यमंत्री झाले. मात्र आता कोर्ट शिंदेंसोबत गेलेल्या १६ आमदारांना पात्र ठरवणार की अपात्र?, शिंदेंनी मांडलेला सत्तेचा डाव विस्कटणार की अभय मिळणार? या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरं आज मिळणारेत. तीन पक्षांची मोट बांधून निर्माण झालेल्या महाविकास आघाडीसह, शिंदेंना सोबत घेऊन सत्तेत सहभागी झालेल्या भाजपचेही डोळे आजच्या निकालाकडे लागले आहेत.


हे ही वाचा :