Winter Joint Pain Causes : थंडी (Winter) वाढताच साथीचे आजार (Viral Disease) वाढतात, त्यात जुनी दुखणीही डोकं वर काढतात. थंडी किंवा तापमानात घट झाल्यास जुन्या दुखण्याचा त्रास वाढतो. तुम्ही अनेकदा आई-बाबा, आजी-आजोबा किंवा एतर प्रौढ व्यक्तींकडून हे ऐकलं असेल किंवा तुम्हालाही याचा अनुभव आला असेल. थंडीत वर्षानुवर्षे जुनी दुखणी पुन्हा त्रास देतात. पण, असं नक्की का होतं? यामागचं वैज्ञानिक कारण जाणून घ्या.


हिवाळ्यात जुनी दुखणी का वाढतात?


जखमा बऱ्या होतात, पण अनेक वर्षानंतरही त्याचं दुखणे कायम राहतं. थंडीच्या मोसमात हा त्रास पुन्हा सुरु होतो. एका रिपोर्टनुसार, थंडीमध्ये आपल्या शरीरावर अधिक दबाव निर्माण होतो. यामुळे अनेकदा स्नायू आणि सांध्यामध्ये वेदना जाणवते. अपघातामुळे तुमच्या हाडांना इजा झाली किंवा मार बसला असेल तर हिवाळ्यात दुखण्याची समस्या वाढू शकते. बॅरोमेट्रिक दाबाच्या (Barometric Pressure) या घसरणीमुळे तुमच्या शरीरातील मऊ ऊतींना सूज येऊ शकते आणि तुमच्या सांध्यावर दबाव येऊ शकतो, ज्यामुळे तुमच्या नसांनाही वेदना जाणवतात. 


बॅरोमेट्रिक दाब कमी होण्याचा परिणाम


हिवाळ्यात सांधेदुखीचे प्रमुख कारण म्हणजे थंडी. कमी तापमानात आपल्या शरीरातील स्नायूंच्या हालचालीवर नियंत्रण राहत नाही, ज्यामुळे आपले सांधे दुखतात. स्नायूंच्या एकाकी होणाऱ्या हालचालीमुळे परिणामी कडकपणा येतो किंवा पेटकेही येतात. हिवाळ्यात आपल्या शरीरातील वेदना रिसेप्टर्स अधिक संवेदनशील होतात, ज्यामुळे आपल्या आधीच तीव्र वेदना जाणवतात.


थंड हवामानात जुनं दुखणं किंवा सांधेदुखी वाढण्यामागचं खरं कारण काय?


थंडीमुळे वातावरणातील तापमानात घट होऊ लागतो, त्यामुळे तुमच्या शरीरातील द्रवपदार्थांवर दबाव वाढतो. विशेषत: तुमच्या गुडघे आणि घोट्यांभोवती दबाव वाढतो. जेव्हा ते थंड वातावरण असते तेव्हा बॅरोमेट्रिक हवेचा दाब वेगाने कमी होतो. दाब कमी झाल्यामुळे, वायू आणि द्रव गुडघे आणि घोट्याभोवती वेगाने पसरू लागतात. हे द्रवपदार्थ जसजसे परसतात, तसतसे ते एकत्र गोळा होऊन मज्जातंतूंवर दबाव टाकतात, ज्यामुळे जुन्या जखमांच्या ठिकाणी पुन्हा वेदना होतात. थंड हवामानमुळे मज्जातंतूंची संवेदनशीलता वाढते आणि मज्जासंस्थेवर ताण येतो. तापमानात घट होणे, हे ट्रिगर म्हणून काम करते. नसा हवामानातील बदलांवर जलद प्रतिक्रिया देतात, परिणामी जुन्या जखमांमुळे पुन्हा वेदना होतात.


'हे' उपाय करुन पाहा


हिवाळ्यात जुन्या दुखण्याची समस्या दूर करायची असेल तर, शरीराची हालचाल सक्रिय ठेवणे गरजेचं आहे. स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी दररोज व्यायाम करणे आवश्यक आहे. हिवाळ्याच्या महिन्यात बरेच लोक शारीरिक हालचाली टाळतात. शारीरिक हालचालींच्या अभावामुळे सांधे, स्नायू आणि ऊतींमध्ये कडकपणा येऊ शकतो आणि जुनी दुखणी वाढू शकतात.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Solo Dating : सिंगल व्यक्तींनो, निराश होऊ नका! सोलो डेटिंगचा आनंद घ्या, मास्टर डेटिंगचा नवा ट्रेंड काय आहे? जाणून घ्या