Health : फक्त 45 दिवस 'हा' न चुकता व्यायाम करा! पोट-कंबरेची चरबी अशी गायब होईल, की आश्चर्यचकित व्हाल, योगतज्ज्ञ सांगतात...
Health : तुम्हाला तुमच्या पोटाची आणि कंबरेची चरबी कमी करायची असेल, तर एका व्यायामाचा सतत 45 दिवस तुमच्या दिनचर्येत समावेश करून तुम्ही फरक पाहू शकता.
![Health : फक्त 45 दिवस 'हा' न चुकता व्यायाम करा! पोट-कंबरेची चरबी अशी गायब होईल, की आश्चर्यचकित व्हाल, योगतज्ज्ञ सांगतात... Health lifestyle marathi news Just exercise for 45 days Belly waist fat will disappear surprise you expert says Health : फक्त 45 दिवस 'हा' न चुकता व्यायाम करा! पोट-कंबरेची चरबी अशी गायब होईल, की आश्चर्यचकित व्हाल, योगतज्ज्ञ सांगतात...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/28/44de307a73ec1ba9a7718ac9a894548d1719568350947381_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Health : कामाचा ताण, बदलत्या जीवनशैलीमुळे अनेकांचे वजन नियंत्रणात राहत नाही. शरीरात चरबीची वाढ होते. ज्यामुळे लोकांना विविध आजारांचा सामना करावा लागतो. अशात तुमचं वाढलेलं तुम्हाला पोट विविध मार्गांनी त्रास देतं. तुमच्या वाढलेल्या पोटाची तुम्हाला लाज वाटते का? पोटाची चरबी आणि कंबरेची चरबी यामुळे तुम्हाला तुमचा आवडता ड्रेस घालता येत नाही का? तसे असल्यास, तुम्हाला अजिबात काळजी करण्याची गरज नाही. पोट आणि कंबरेवरील हट्टी चरबी कमी करण्यासाठी आहाराकडे लक्ष दिले पाहिजे. तसेच, यासाठी व्यायाम करणे खूप महत्वाचे आहे. जर तुमच्याकडे जिमला जाण्यासाठी वेळ नसेल तर तुम्ही घरी हा सोपा व्यायाम करून पोट आणि कंबरेची चरबी सहज कमी करू शकता. एका वृत्तसंस्थेने घेतलेल्या माहितीनुसार योगतज्ज्ञ नताशा कपूर यांनी याबाबत माहिती दिलीय. त्या एक प्रमाणित योग शिक्षिका आहे.
पोटाची चरबी कमी करण्यासाठी, भिंतीच्या मदतीने हा व्यायाम करा.
सर्व प्रथम, योगामॅट पसरवा.
ही मॅट भिंतीला लागून ठेवा.
योगामॅटवर झोपा.
तुम्हाला तुमचे पाय वरच्या दिशेने उंच करावे लागतील आणि त्यांना भिंतीवर ठेवावे लागेल.
शरीराचा वरचा भाग योगामॅटवर असावा.
यानंतर तुमचे दोन्ही हात मागे घ्या.
आता हात पुढे करा आणि वर करा.
हे करत असताना तुमचे पाय कात्रीसारखे उघडावे लागतात.
यानंतर, पुन्हा झोपा आणि पुन्हा आपले हात मागे फिरवा.
जर तुम्ही नवीन असाल तर हे 4 सेटमध्ये 10 वेळा करा.
हळूहळू वेळ वाढवावा लागेल.
त्यानंतर, तुम्हाला हे 6 सेटमध्ये 40 वेळा करावे लागेल.
या व्यायामामुळे तुम्हाला कोणते फायदे मिळतील?
हा व्यायाम केल्याने पोटाची चरबी कमी होते.
त्यामुळे पोटाच्या स्नायूंवर दबाव येतो आणि लटकलेले पोट आत जाते.
तसेच, ज्या लोकांचे पोट लटकले आहे किंवा त्यांच्या कंबरेवर आणि नितंबांवर चरबी जमा होत आहे, त्यांच्यासाठी देखील उपयुक्त असेल.
यामुळे मांड्यांची चरबी कमी होते.
हा व्यायाम करताना शरीरातील अनेक स्नायू काम करतात. यामुळे हाताची चरबीही कमी होईल.
हे करत असताना सुरुवातीला तुम्ही अचानक उठू नका हे लक्षात ठेवावे.
यामुळे पेटके येऊ शकतात.
तज्ज्ञांच्या मते, तुम्हाला हे 45 दिवस कोणत्याही अंतराशिवाय सतत करावे लागेल. असे केल्याने तुम्हाला पोटाच्या चरबीत फरक जाणवू शकतो.
यासोबतच आहाराकडेही लक्ष द्या.
हेही वाचा>>>
Women Health : हिना खानला झालेला 'स्टेज 3 ब्रेस्ट कॅन्सर' म्हणजे काय? 'ही' लक्षणं तुम्हाला नाही ना? का वाढतोय हा जीवघेणा आजार?
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)