मुंबई :  देशात पेट्रोल आणि डिझेलच्या ( PETROL DIESEL PRICE) किंमती गगनाला भिडल्या आहेत. यामुळे लोक अस्वस्थ आहेत, लोकांमध्ये संतापही बघायला मिळतो आहे. देशाची राजधानी दिल्लीमध्ये एका लीटर पेट्रोलसाठी 105.84 रुपये प्रति लीटर आणि डिझेल 94.57 रुपये प्रति लीटर मोजावे लागत आहेत.तर आर्थिक राजधानी मुंबईमध्ये पेट्रोलचा दर 111 रुपये प्रति लिटर इतका आहे.


परंतु, एकीकडे या किमती गगनाला भिडलेल्या असताना त्याच गगनातून भरारी मारणाऱ्या विमानाच्या जेट इंधनाची किंमत खूप कमी आहे. दिल्लीमध्ये जेट इंधनाची किंमत प्रति किलोलिटर 79,020.16 रुपये आहे. अशा प्रकारे प्रति लिटर किंमत 79 रुपये इतकीच आहे. देशभरात पेट्रोल यापेक्षा सुमारे 33 टक्के अधिक महाग विकले जात आहे.


आता हे जेट इंधन म्हणजे काय? हे पेट्रोल आणि डिझेल व्यतिरिक्त काही आहे का? त्याची किंमत इतकी कमी आहे का? असे नानाविध प्रश्न तुम्हाला पडले असतील तर त्याचीच उत्तर जाणून घेऊया..


जेट इंधन काय आहे?


वास्तविक, जेट इंधन आणि पेट्रोल दोन्ही एकच गोष्टी आहेत. तांत्रिक भाषेत पेट्रोलला गॅसोलीन (Gasoline)  म्हणतात. अमेरिका आणि युरोप या देशांमध्ये पेट्रोलला गॅसोलीन म्हणून ओळखलं जातं. पण यात मुख्य बाब ही आहे की तुम्ही जेट इंधनावर तुम्ही तुमची कार चालवू शकत नाही. जेट इंधन हे कच्च्या तेलाच्या सर्वात मूलभूत उपउत्पादनांपैकी एक आहे. हे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर काटेकोरपणे नियंत्रित केलं जातं. जेट इंधनाचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत. जेट ए आणि जेट बी. त्यांच्या गुणवत्ता आणि अतिशीत बिंदूनुसार (Freezing Point) अशा दोन प्रकारांमध्ये विभागले गेले आहेत. जेट बी इंधन प्रामुख्याने लष्करी कार्यासाठी आणि अत्यंत खराब हवामानाच्या परिस्थितीत वापरलं जातं. जेट बी इंधन जेट ए इंधनापेक्षा कमी शुद्ध आहे.


जेट इंधन कसे बनवले जाते?


कच्चे तेल शुद्ध करताना, जेट इंधन आणि पेट्रोल वेगळे केले जातात. या दोघांमधील मूलभूत फरक त्यांच्यातील हायड्रोकार्बनच्या प्रमाणावर आधारित आहे. पेट्रोल हा हायड्रोकार्बन आहे ज्यात 7 ते 11 कार्बन अणू असतात, तर जेट इंधन हा हायड्रोकार्बन असतो. ज्यात 12 ते 15 कार्बन अणू असतात. अधिक स्पष्टपणे सांगायचे तर, जेट इंधन मुख्यत्वे रॉकेल पासून बनवलं जातं.


जेट इंधन पेट्रोलपेक्षा स्वस्त का आहे?


खरंतर, देशातील पेट्रोलियम उत्पादनांवरील कर वगळता, त्यांना शुद्ध करण्याचा खर्चही ग्राहकांकडून आकारला जातो. कच्चे तेल पेट्रोल, डिझेल, जेट इंधन, रॉकेल आणि एलपीजी सारख्या सर्व उप-उत्पादने बनवण्यासाठी परिष्कृत (Sophisticated) आहे. शुद्धीकरणाच्या या प्रक्रियेत जेट इंधन बनवण्याचा खर्च कमी होतो. जेट इंधन हे परिष्कृत इंधन नाही. तर पेट्रोल हे अत्यंत परिष्कृत (Sophisticated) इंधन आहे.