Weight Loss Method: सध्या अनेकांची लाईफस्टाईल आणि आहार बदलला आहे.  आहारामध्ये जंक फूडचे प्रमाण वाढल्याने त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो. अनेकांना सध्या वाढलेल्या वजनाचा त्रास होत आहे. फिट राहण्यासाठी वेगवेगळे व्यायाम लोक करत असतात. निरोगी राहण्यासाठी शरीरातील फॅट्स कमी करणे गरजेचे आहे.  वजन कमी करण्यासाठी या तीन सोप्या स्टेप्स नक्की ट्राय करा. यामुळे तुमचे वजन कमी होऊ शकते. 


1 शरीरातील रिफाइंड कार्ब्स कमी करा- जर तुम्हाला  वजन कमी करायचे असेल तर तुम्ही साखर आणि स्टार्चचे प्रमाण जास्त असणारे पदार्थ खाणे टाळावे. लो- कार्ब असणारे पदार्थ आहारात घ्यावेत. रिफाइन कार्ब्समुळे वजन वाढते. आहारामध्ये वेगवेगळ्या धान्याचा समावेश करा धान्यामध्ये कॅलरीचे प्रमाण कमी असते.  त्यामुळे तुम्हाला भूक कमी लागेल व वजन कमी होईल. 


2 हिरव्या पालेभाज्या- जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर तुम्हाला प्रोटी सोर्स, फॅट सोर्स असणाऱ्या भाज्या आणि कॉम्प्लेक्स कार्बोहाइड्रेट हे सर्व असणाऱ्या धान्यांचा  आहारात समावेश करावा लागेल. त्यामुळे रोज आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या आणि वेगवेगळ्या डाळींचा समावेश करावा. 


World Food Day 2021: जागतिक अन्न दिन; जाणून घ्या महत्व, इतिहास आणि या वर्षाची थीम


3. नियमीत व्यायाम करावा-  वजन कमी करण्यासाठी व्यायाम करणे गरजेचे आहे. व्यायाम केल्याने तुमच्या शरीरातील फॅट्स कमी होतात. तसेच व्यायामुळे तुमची पचनक्रिया देखील  चांगली होण्यास मदत होते. 


वरील टिप्स फॉलो केल्याने तुमचे वजन कमी होऊ शकते. तसेच वजन कमी करण्यासाठी तुम्ही विविध पिठांच्या भाकऱ्यांचा आहारात समावेश करू शकता. ओट्सची भाकरी, ज्वारीचे पिठाची भाकरी, नाचणीच्या पिठाची भाकर, बाजरीच्या पिठाची भाकरी इत्यादी भाकऱ्यांचा समावेश आहारात करावा. 


Health Care Tips: 'या' लोकांनी चुकूनही करू नये दुधासोबत हळदीचे सेवन; आरोग्यावर होतील वाईट परिणाम


टिप- वरील माहितीची पुष्टी एबीपी माझा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधे हे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्यावेत.