Health Care Tips: निरोगी राहण्यासाठी शरीराला हायड्रेट ठेवणे गरजेचे असते. पाणी कमी प्यायल्याने अनेक आजार होऊ शकतात. आपल्या शरीरात 70% पाणी असते. त्यामुळे पाणी कमी प्यायल्याने मायग्रेन, अपचन आणि लठ्ठपणा इत्यादी समस्या तुम्हाला होऊ शकतात.  दिवसभरात पाणी पित राहावे. पण जर तुम्ही सतत पाणी पित असाल किंवा तुम्हाला सारखी तहान लागते, तर तुम्हाला या आजारांना समोरे जावे लागेल. जाणून घेऊयात जास्त पाणी प्यायल्याने कोणते आजार होतात. 
 
डायबिटीज- अनेकांना कमी वयात मधुमेह होतो. याचे कारण आहे तुमची लाइफस्टाईल. सारखी तहान लागणे हे मधुमेहाचे लक्षण आहे. मधुमेह झाल्यावर रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. जे किडनी सहज फिल्टर करू शकत नाही. त्यामुळे शरीरात पाण्याचे प्रमाण कमी होऊन सारखी तहान लागते. 
 
घाम जास्त येणे- जास्त घाम येत असेल तर शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते. तसेच, शरीरातील तापमानामध्ये समतोल राखण्यासाठी आपले शरीर अधिक पाण्याची मागणी करते, ज्यामुळे आपल्याला तहान देखील जास्त लागते.


जास्त पाणी प्यायल्याने हार्ट फेलियर होऊ शकते. तसेच  जास्त प्यायल्याने शरीरामध्ये रक्ताचे प्रमाण वाढते ज्याचा दबाव हृदयांच्या नसांवर निर्माण होतो. जास्त दबावाने हार्ट फेलियर होऊ शकते. त्यामुले योग्य प्रमाणात पाणी प्यावे. 


सकाळी आणि दुपारी किती पाणी प्यावे?
सकाळी उठल्यानंतर 3  ग्लास पाणी प्यावे. रोज याच प्रमाणात पाणी प्या. जेवल्यानंतर 2 तासांनंतर पाणी प्यायले पाहिजे. तसेच पाणी पिल्यानंतर 45 मिनीटांनंतर नाश्ता करावा. त्या आधी काहीही खाऊ नये.  पाणी कमी प्यायल्याने मायग्रेन, अपचन आणि लठ्ठपणा इत्यादी समस्या तुम्हाला होऊ शकतात.  


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


Tea Side Effects: दिवसातून चार कप चहा पिताय? तर सावधान, होऊ शकतं नुकसान