Tea Side Effects: अनेक लोक त्यांच्या दिवसाची सुरूवात चहाने करतात. काही जणांना दिवसातून 4 ते 5 वेळा चहा पिण्याची सवय असते. अनेक जण थकवा आणि डोकेदुखी होत असल्याने दिवसातून कित्येक वेळा चहा पितात. पण सारखा चहा पिण्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.  जाणून घेऊयात जास्त चाहा प्यायल्याने कोणते साइड इफेक्ट होतात.

एक कप चहामध्ये  60 मिलीग्राम कॅफीन असते. त्यामुळे दिवसातून 3 कप चहा प्यावा. त्यापेक्षा जास्त चहा प्यायल्याने या समस्या उद्भवू शकतात. 1.चहामध्ये असणाऱ्या टॅनिनमुळे शरीराची लोह शोषण्याची क्षमता कमी होते. त्यामुळे शरीरातील लोहाचे प्रमाण कमी होऊ शकते. 

2. चक्कर येणे- चहामध्ये असणाऱ्या कॅफिनमुळे तुम्हाला चक्कर येऊ शकते. त्यामुळे जास्त चहा पिणे टाळा

2.अॅसिडीटी होते-  चहा किंवा कॉफी अॅसिडीक असल्याने रिकाम्या पोटी चहा पिल्याने शरिराचे अॅसिडीक बॅलेन्स बिघडतो. त्यामुळे तुम्हाला अॅसिडीटी होऊ शकते. त्यामुळे उपाशी पोटी चहा पिऊ नये. चहा किंवा कॉफी जर तुम्हाला प्यायची असेल तर  जेवणानंतर किंवा नाश्ता झाल्यानंतर तुम्ही चहा किंवा कॉफी पिऊ शकता.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्त्वाच्या इतर बातम्या :