Kala Chana Benefits : भारतीय स्वयंपाकघरात कडधान्यात सहज आढळणारे कडधान्य म्हणजे काळे चणे. सहज उपलब्ध असलेल्या काळ्या चण्यात अनेक आरोग्यदायी गुणधर्म आढळतात. यासोबतच काळे चणे हे शाकाहारी लोकांसाठी प्रथिनांचे सर्वात महत्त्वाचे स्त्रोत मानले जाते. या सहज उपलब्ध असलेल्या काळ्या चण्यात अनेक पौष्टिक घटकांचा समावेश होतो. ज्यामुळे अनेक प्रकारचे आजार तुमच्यापासून दूर राहू शकतात. चण्यांमध्ये प्रथिने, कार्बोहायड्रेट्स, फायबर, कॅल्शियम, लोह आणि जीवनसत्त्वे असतात, जे आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहेत. चणे केवळ तुमची बुद्धी तल्लख करत नाही तर त्याचबरोबर तुमचे वाढते वजनही नियंत्रित ठेवतात. चणे खाल्ल्याने तुम्हाला इतर कोणते फायदे मिळू शकतात ते जाणून घ्या.
चण्यापासून मिळणारे फायदे :
हृदयविकारापासून दूर : काळ्या चण्याच्या सेवनाने हृदयविकारापासून मुक्ती मिळते. वास्तविक, काळ्या चण्यात अँटिऑक्सिडंट, सायनिडिन, पेटुनिडिनचे गुणधर्म आढळतात, जे रक्तवाहिन्या मजबूत आणि निरोगी ठेवण्यास मदत करतात.
रक्ताची कमरता भरून काढता येते : काळ्या चण्यात लोह मुबलक प्रमाणात आढळते. ज्याच्या मदतीने शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढता येते. काळे चणे अॅनिमियाच्या समस्येवर मात करण्यास मदत करतात. दुसरीकडे, गरोदर किंवा स्तनपान करणाऱ्या महिलांनी काळ्या चण्याचे सेवन करणे आवश्यक आहे.
पचनक्रिया सुधारण्यास मदत : काळ्या चण्याच्या सेवनाने पचनक्रिया चांगली राहते. यामध्ये फायबर मुबलक प्रमाणात आढळते, जे पचनासाठी आवश्यक असते. काळ्या चण्याच्या सेवनाने बद्धकोष्ठतेची समस्याही दूर राहते. यासाठी तुम्ही चणे रात्रभर भिजवून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी खा.
चेहरा तजेलदार होतो : काळ्या चण्यामध्ये आढळणारे झिंक सुरकुत्या आणि मुरुम दूर करण्यास मदत होते. दुसरीकडे, जर तुम्ही उकडलेले चणे खाल्ले तर तुमच्या चेहऱ्यावर चमक कायम राहते.
वजन नियंत्रित ठेवते : काळ्या चण्यामध्ये प्रोटीन आणि फायबर असते, ज्यामुळे तुम्हाला लवकर भूक लागत नाही. तुम्हाला हवे असल्यास वजन कमी करण्याच्या प्रवासात तुम्ही ते खाऊ शकता. चाट बनवूनही खाऊ शकता. जे आरोग्यासाठी खूप चांगले असते.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्वाच्या बातम्या :