Hair Care Tips : गळणारे केस असोत किंवा निस्तेज त्वचा, घरगुती उपायांसाठी आहारात वेगवेगळ्या गोष्टींचा समावेश करणं गरजेचं आहे. त्यामुळे केसगळती (Hair Care Tips) थांबते किंवा त्वचा पुन्हा ग्लो करू लागते. अशा परिस्थितीत, केसगळती थांबविण्यासाठी वेगवेगळ्या पदार्थांचं सेवन करण्यापेक्षा काही पदार्थ आपल्या आहारातून  पूर्णपणे काढून टाकल्या तर ते अधिक सोयीचं ठरेल.  


या ठिकाणी आम्ही तुम्हाला अशाच खाद्यपदार्थांची यादी सांगणार आहोत, ज्याच्या सेवनाने तुम्ही केस गळण्याच्या समस्येपासून सुटका मिळवू शकता. या गोष्टी जर तुम्ही खायच्या बेद केल्या तर तुमची केसगळतीची समस्या कायमची दूर होण्यास मदत होईल. या गोष्टी नेमक्या कोणत्या आहेत ते जाणून घेऊयात.  


साखर 


जास्त साखर आरोग्यासाठी तसेच केसांसाठीही हानिकारक आहे. मधुमेह आणि लठ्ठपणाला कारणीभूत ठरणारी साखर देखील केसगळतीचे कारण असल्याचे काही अभ्यासात सिद्ध झाले आहे. जास्त साखर, स्टार्च आणि रिफाइंड कार्बोहायड्रेट्समुळे केस गळती होऊ शकते.


मद्यपान 


केसांमध्ये एक प्रोटीन असते, केराटिन प्रोटीन, ज्यामुळे केसांची रचना योग्य राहते. अल्कोहोलचे सेवन केल्याने प्रथिनांच्या निर्मितीवर परिणाम होतो. ज्यामध्ये केराटीन देखील समाविष्ट आहे. अतिरिक्त अल्कोहोलमुळे, केराटिन प्रोटीनचे प्रमाण देखील कमी होते आणि केस कमकुवत होऊ लागतात.


केसगळती थांबवायची असेल तर या टिप्स वापरून पाहा


बहुतेक आहार सोडामध्ये एस्पार्टम नावाचे कृत्रिम स्वीटनर असते. साखरेप्रमाणेच हे केसांच्या मुळांपासून नुकसान पोहोचवते. त्यामुळे केस कमकुवत होऊन गळू लागतात.


जंक फूडमुळे केसांचे नुकसान होण्याची प्रक्रिया खूप गुंतागुंतीची आहे. जास्त जंक फूड खाल्ल्याने शरीरातील हार्मोनल संतुलन बिघडते. जंक फूडमध्ये असलेले तेल टाळूला तेलकट ठेवते. जास्त तेलामुळे केसांची मूळं कमजोर होतात.


केसांसह संपूर्ण शरीराच्या आरोग्यासाठी अंडी चांगली असतात. पण, कच्ची अंडी आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असू शकतात. कच्च्या अंड्याच्या सेवनामुळे बायोटिनची कमतरता होऊ शकते. बायोटिन हे एक जीवनसत्व आहे जे केराटिन उत्पादनास मदत करते. केराटीन कमी झाल्याचा परिणाम केसांवर होतो. हे जर उपाय तुम्ही फॉलो केले तर तुमची केसगळतीची समस्या दूर होईल. 


महत्त्वाच्या बातम्या :


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


Hair Care Tips : केस स्ट्रेटनिंग आणि कलरिंगबद्दल डॉक्टरांचं म्हणणं काय? शरीराच्या 'या' अवयवांना कर्करोगाचा धोका