एक्स्प्लोर

Ginger Benefits : केवळ चविष्ठच नाही, तर आरोग्यदायीही ‘आल्याचा मुरांबा’, जाणून घ्या रेसिपी

Ginger Benefits : आल्याचा मुरांबा (Ginger Murabba) खायला खूप चविष्ट असतो आणि शरीरातील सर्व समस्या दूर करण्यासाठी देखील उपयुक्त मानला जातो. हिवाळ्यात दम्याच्या रुग्णांसाठी देखील आल्याचा मुरांबा लाभदायी आहे.

Ginger Murabba Recipe : आरोग्याच्या दृष्टीने आल्याचे (Ginger) अनेक फायदे आहेत. आले पचन सुधारते, सर्दीच्या प्रभावापासून संरक्षण करते, खोकला-सर्दी आणि घसा खवखवणे यासारख्या समस्यांपासून आराम देते. यामुळेच लोक हिवाळ्यात चहामध्ये किंवा जेवणामध्ये आले वापरतात. पण, अनेकांना आल्याची चव आवडत नाही. अशा लोकांना आल्याचे फायदे मिळवून देण्यासाठी तुम्ही आल्याचा मुरांबा (Ginger Murabba) बनवू शकता.

आल्याचा मुरंबा खायला खूप चविष्ट असतो आणि शरीरातील सर्व समस्या दूर करण्यासाठी देखील उपयुक्त मानला जातो. हिवाळ्यात दम्याच्या रुग्णांसाठी देखील आल्याचा मुरांबा लाभदायी आहे. तुम्ही देखील हा खास पदार्थ बनवण्याचा विचार करत असाल, तर ही रेसिपी नक्की ट्राय करा.

आल्याच्या मुरंब्यासाठी साहित्य

आल्याचा मुरांबा अवघ्या अर्ध तासात बनणारा पदार्थ आहे. शिवाय यासाठी जास्त साहित्यही आवश्यक नाही. 1 किलो आल्याचा मुरांबा बनवण्यासाठी आले, 1 किलो साखर, 20 ग्रॅम वेलची पावडर, 10 मिली गुलाबपाणी आणि एक लिंबू आवश्यक आहे.

कसा बनवाल आल्याचा मुरांबा?

* सर्वप्रथम आले धुवून त्याची साल काढा. यानंतर आल्याचे छोटे छोटे तुकडे करा. आता गॅसवर एक खोलगट पॅन ठेवा, त्यात एक ग्लास पाणी आणि साखर घाला.

* पाणी आणि साखर व्यवस्थित उकळू द्या आणि त्याचा पाक बनू द्या. आता दुसरे भांडे घ्या आणि त्यात आले उकडून घ्या. यानंतर आल्याचे तुकडे तयार पाकात टाका आणि व्यवस्थित मिक्स करा.

* नंतर त्यात वेलची पावडर, लिंबू, गुलाब पाणी मिसळून मंद आचेवर शिजवा. नीट शिजल्यावर, थंड करून काचेच्या डब्यात भरून ठेवा आणि हवा तेव्हा त्याचा आस्वाद घ्या.

आल्याच्या मुरांब्याचे फायदे :

आले गरम प्रभावाचा असते, म्हणून खोकला, सर्दी दरम्यान तुम्ही ते खाऊ शकता. याशिवाय गॅस, अपचन, मळमळ आदी समस्यांमध्येही याचे सेवन केल्यास आराम मिळतो. शिवाय आपण सँडविचमध्ये स्प्रेड, जाम म्हणून देखील यांचा वापर करू शकता.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

ठाणे आणि मुंबई उपनगरांतील पहिली कोरोनरी एक्सायमर लेझर अँजिओप्लास्टी यशस्वी, रुग्णाला दिले जीवदान 
ठाणे आणि मुंबई उपनगरांतील पहिली कोरोनरी एक्सायमर लेझर अँजिओप्लास्टी यशस्वी, रुग्णाला दिले जीवदान 
Health News: पावसाळ्यात वाढते मुलांमधील हाडांच्या फ्रॅक्चरचे प्रमाण; पालकांनी काय काळजी घ्यावी?
पावसाळ्यात वाढते मुलांमधील हाडांच्या फ्रॅक्चरचे प्रमाण; पालकांनी काय काळजी घ्यावी?
Health: पावसात भिजल्यानंतर मुलांचे ओले कपडे तसेच ठेवताय? वाढू शकतो युटीआय संसर्गाचा गंभीर धोका
पावसात भिजल्यानंतर मुलांचे ओले कपडे तसेच ठेवताय? वाढू शकतो युटीआय संसर्गाचा गंभीर धोका
Navi Mumbai : घशात अडकलेल्या माशाच्या काट्यामुळे जीवावर बेतले; नवी मुंबईतील मेडिकव्हरमध्ये दोन रुग्णांवर यशस्वी उपचार
घशात अडकलेल्या माशाच्या काट्यामुळे जीवावर बेतले; नवी मुंबईतील मेडिकव्हरमध्ये दोन रुग्णांवर यशस्वी उपचार

व्हिडीओ

Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report
Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report
CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report
NEET Protest Jantar Mantar :सकाळच्या चहापासून जेवणापर्यंत,आंदोलनात विद्यार्थ्यांचाच एकमेकांना आधार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi : भारताच्या विद्यार्थ्यांसोबत उभं राहताना आम्हाला कोणी रोखू शकत नाही, राहुल गांधी इंडिया आघाडीच्या  खासदारांसह गांधी स्मृती स्थळावर 
विद्यार्थी रस्त्यावर त्यांना विरोधी पक्षांच्या खासदारांचा पाठिंबा, राहुल गांधींसह INDIA आघाडीचे खासदार गांधी स्मृती स्थळावर
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
मॅगीने भरलेला मालवाहू ट्रक जगबुडी नदीत कोसळला; नदीच्या प्रवाहात ड्रायव्हरसह 400 मीटरपर्यंत वाहून गेला
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद; पोलिसांची व्हॅन अडवणारी रिया कोण? आंदोलनावर काय म्हणाली
IND vs ZIM: टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
Salman khan Delhi Protest: प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
प्लीज गो बॅक टू होम.. सलमान खानचं दिल्लीतील आंदोलकांना आवाहन; सोनम वांगचुकांनाही घरचं जेवण पाठवणार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 23 जुलै 2026 | गुरुवार
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
मुंबईकरांसाठी गुडन्यूज; मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोडकसागर अन् तानसा धरण 100 टक्के भरले, मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
संपूर्ण देशातील तरुण रस्त्यावर असताना मोदी संसदेत येत नाहीत, अमित शाहांना विचारलं लाठीचार्ज का केला? एनएसए का लावला, ते दहशवादी आहेत?? आणि मला विचारता संसद का चालत नाही? प्रियांका गांधींचा संताप
Embed widget