एक्स्प्लोर

Gauri Pujan 2022 : गौराई माझी लाडाची लाडाची गं... शनिवारी कोणत्या शुभ मुहूर्तावर कराल गौरी आवाहन? पंचागकर्ते मोहन दाते सांगतात...

Gauri Pujan 2022 : गौरींचे माहेरवाशीणीसारखे स्वागत केले जाते. भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षात अनुराधा नक्षत्रावर शनिवारी, 3 सप्टेंबर 2022 गौरींचे घरोघरी आगमन होते.  

मुंबई : भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षात गौरींचे पूजन (Gauri Pujan 2022) करतात. गौरीने भाद्रपद शुद्ध अष्टमीला असुरांचा संहार केला.  तेव्हापासून अखंड सौभाग्य प्राप्त होण्यासाठी स्त्रिया ज्येष्ठा गौरी हे व्रत करतात.  गौरीपूजनला काही ठिकाणी महालक्ष्मीपूजन असेही म्हणतात.  गौरी किंवा महालक्ष्मीचे पूजन ज्येष्ठ नक्षत्रावर केले जाते, म्हणून यांना ज्येष्ठागौरी असेही संबोधले जाते. यावर्षी अनुराधा नक्षत्रावर दिवसभरात केव्हाही गौरी आणून आवाहन करता येईल, असे पंचागकर्ते मोहन दाते म्हणाले. 

गौरीच्या स्थापनेचा मुहूर्त काय आहे? (Gauri Pujan 2022 muhurat time)

गौरीपूजन गणपती बाप्पाच्या आगमनानंतर साजरा केले जाते.  गौरींचे माहेरवाशीणीसारखे स्वागत केले जाते. भाद्रपद महिन्याच्या शुद्ध पक्षात अनुराधा नक्षत्रावर शनिवारी, 3 सप्टेंबर 2022 गौरींचे घरोघरी आगमन होते.  ज्यांच्याकडे गौरी आहे त्यांनी अनुराधा नक्षत्रवर दिवसभरात केव्हाही गौरी आणून आवाहन करता येईल. 4 सप्टेंबरला रविवारी गौरीपूजन ज्याला आपण गौरी जेवतात असं म्हणतो तो रविवारचा दिवस आहे. ज्येष्ठा नक्षत्रावर गौरी पूजा करतात व महानैवेद्य दाखवितात. तिला गोडाधोडाचे जेवण केले जाते. यामध्ये 16 भाज्या, पंचपक्वान्न असा बेत केला जातो. नेहमीप्रमाणे  महालक्ष्मीची सकाळी दुपारी पूजा करून चांगला नैवेद्य दाखवून तो आपण प्रसाद म्हणून घ्यायचा आहे. 5 सप्टेंबरला मूळ नक्षत्रावर गौरींचे विसर्जन असल्याने रात्री 8 वाजेपर्यंत कधीही आपल्या सोयीने गौरी विसर्जन करू शकता.

गौरीचे स्वागत कसे करावे?

गौराई आली सोन्याच्या पावलांनी, माणिक मोत्याचा पावलांनी असे म्हणत गौरी माहेरवाशीण म्हणून येते. त्या दिवशी दारात रांगोळी काढून, लक्ष्मीची पावले काढून, ताट आणि चमचा वाजवत गौरीचे मुखवटे घरात आणले जातात. त्यांना छान दागिने, फुलांचे हार, नव्या साड्या नेसून गौरीला सजवले जाते. तिला गोडाधोडाचे जेवण केले जाते. यामध्ये 16 भाज्या, पंचपक्वान्न असा बेत केला जातो.

गौरीचे मुखावटे

विदर्भ, मराठवाड्यासह काही ठिकाणी महालक्ष्मींचे मुखवटे ठेवले जातात. विदर्भात खास करून गौरीला महालक्ष्मी म्हणतात. याशिवाय काही ठिकाणी तेरड्याची गौर असते. विविध भागात गौरीपूजनाच्या,  मांडणीच्या पद्धतीत आधुनिकता दिसून येते. गौरीसह त्यांची मुलेही मांडतात.   तर काही ठिकाणी राशीच्या महालक्ष्मी असतात. म्हणजेच घरातील पाच धान्यांच्या राशी मांडून त्यांची पूजा करण्याची पद्धत आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Diabetes Diet Tips : डायबिटीजमध्ये लोणचे, पापड अन् चटणी खाणे योग्य की अयोग्य? रक्तातील साखरेवर काय परिणाम? 
डायबिटीजमध्ये लोणचे, पापड अन् चटणी खाणे योग्य की अयोग्य? रक्तातील साखरेवर काय परिणाम? 
FSSAI School Food Guidelines : शालेय विद्यार्थ्यांच्या आहाराबाबत FSSAI नवा फॉर्म्युला; कँटिनमधील पदार्थांमधील हाय शुगर, फॅट अन् सॉल्टसाठी मर्यादा निश्चित
शालेय विद्यार्थ्यांच्या आहाराबाबत FSSAI नवा फॉर्म्युला; कँटिनमधील पदार्थांमधील हाय शुगर, फॅट अन् सॉल्टसाठी मर्यादा निश्चित
कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणारी बँक! दरवर्षी 2 हजार 357 कोटी रुपयांचा खर्च, जाणून घ्या सविस्तर माहिती
कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची काळजी घेणारी बँक! दरवर्षी 2 हजार 357 कोटी रुपयांचा खर्च, जाणून घ्या सविस्तर माहिती
त्वचादानासाठी संपूर्ण देशात व्यापक यंत्रणा उभारा: खासदार विनोद तावडे यांची राज्यसभेत मागणी
त्वचादानासाठी संपूर्ण देशात व्यापक यंत्रणा उभारा: खासदार विनोद तावडे यांची राज्यसभेत मागणी

व्हिडीओ

Sanjay Raut PC : शिवसेना सुनावणी, शिंदेंवर हल्लाबोल ते गडचिरोली प्रकरण; संजय राऊतांचा हल्लाबोल!
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Gatari Pune News: आधी मटण घेणार, मगच ऑफिसला जाणार...; गटारी स्पेशल पुणेकरांचा बेत
Manoj Jarange Mumbai Protest : मनोज जरांगेंची पुन्हा मुंबईकडे कूच? भगवं वादळ मुंबईत घडकणार?
Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar : महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
महिला नेतृत्वावर टीका करणाऱ्यांना कामातून उत्तर देणार; देवेंद्र फडणवीसांच्या पाठिंब्याबद्दल सुनेत्रा पवारांचे आभार
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
राष्ट्रवादीच्या महिला नेत्याचा वेगळाच अंदाज; शेतात 'धामण' साप पकडल्यानंतर रोहिणी खडसेंचं आवाहन
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 12 ऑगस्ट 2026 | बुधवार
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
B.Tech इंजिनिअरने ड्रायव्हर बनून चोरली लक्झरी कार; व्हर्च्युअल व्हॉट्सअप मोबाईल नंबर बनवून पसार, अखेर पुण्यात बेड्या
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
Video: अन् क्रेटा कार दुभाजकाला धडकून तब्बल 10 फुट हवेत उडाली; गँगस्टर अतीक अहमदच्या लेकाच्या भीषण अपघाताचा भयावह Live व्हिडिओ समोर
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
अशा पद्धतीने कोणतेही सरकार पाडू शकता, एखाद्या विधीमंडळ पक्षाची सत्ताधारी पक्षाला विक्री कशी होऊ शकते? कायद्याला लोकशाहीची विटंबना करू देऊ नका, कपिल सिब्बलांची कोर्टात 'सर्वोच्च' साद
पेपरफूट गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परीक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
पेपरफूट गैरप्रकारबाबत केंद्राचा कायदा राज्यात लागू, परीक्षा पद्धती सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती; मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
मग गेली 13 वर्षे निवडणूक आयोगाला दुसरी कोणती पक्षाची घटना आहे का हे शोधता आलं नाही? त्यांनी आधीच निकाल ठरवत आपल्या तर्कामध्ये फेरफार केला; कपिल सिब्बलांकडून आयोगाची पुन्हा चिरफाड
Embed widget