Friendship Based Films : मैत्रीचं (Friendship Day 2022) नातं हे असं नातं आहे जे रक्ताच्या नात्याने बनत नाही. पण हे नातं सर्वात खास मानलं जातं. कारण तुमच्या मित्र-मैत्रिणींबरोबर तुम्ही कोणत्याही गोष्टी मनात न ठेवता शेअर करू शकता. मैत्री म्हटल्यावर राग-रुसवा भांडण, मस्ती, आनंद, दंगा, भावनिक होणं या सगळ्याच गोष्टी आल्या. यामुळेच ते नातं अधिक खुलत जातं. अशाच मैत्रीवर आधारिक बॉलिवूडमध्ये काही चित्रपट आले आहेत. ज्यामधून मैत्रीची संकल्पना अधिक खुलत जाते. हे चित्रपट कोणते ते जाणून घ्या.   


दिल चाहता है (Dil Chahta Hai) 


फरहान अख्तर दिग्दर्शित 'दिल चाहता है' (Dil Chahta Hai) हा चित्रपट मैत्रीवर आधारित आहे. कॉलेजनंतर तीन जवळच्या मित्रांच्या नातेसंबंधांबद्दलच्या वेगळ्या दृष्टिकोनामुळे हे मित्र वेगळे होतात. आकाश ऑस्ट्रेलियाला जातो, समीर एका मुलीला इम्प्रेस करण्यात व्यस्त होतो आणि सिद्धार्थ स्वतःला कलेमध्ये बुडवून घेतो. मात्र, अनेक वर्षांनंतर हे तिघे गोव्याच्या दौऱ्यावर जातात आणि त्यांची मैत्री पुन्हा खुलते. 


जिंदगी ना मिलेगी दोबारा (Zindagi Na Milegi Dobara)


झोया अख्तर दिग्दर्शित 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' हा चित्रपट हृतिक रोशन, फरहान अख्तर आणि अभय देओल या तीन मित्रांच्या मैत्रीवर आधारित आहे. मैत्रीचा पूरेपूर आनंद घेण्यासाठी हे तीन मित्र स्पेन रोड ट्रिपला जातात. हा चित्रपट प्रेक्षकांना चांगलाच आवडला होता.


काय पो छे (Kai Po Che)


'काई पो छे' हा चित्रपटही मैत्रीवर आधारित आहे. यात सुशांत सिंग राजपूत, राजकुमार राव आणि अमित साध यांच्या मैत्रीचे वर्णन केले आहे. त्यांच्या आयुष्यात अनेक समस्या आहेत, पण तिघेही एकमेकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात. हा चित्रपट अभिषेक कपूरने दिग्दर्शित केला होता.


3 इडियट्स (3 Idiots)


राजकुमार हिरानी दिग्दर्शित '3 इडियट्स' हा चित्रपट रँचो (आमिर खान), फरहान (आर. माधवन) आणि राजू (शर्मन जोशी) यांच्याबद्दल आहे. एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये यांची भेट होते. कॉलेजमधील स्पर्धात्मक युग, आपल्या पॅशनला जपणं आणि घट्ट मैत्री हे या चित्रपटाच्या माध्यमातून दाखविण्यात आले आहे. 


आरआरआर (RRR)


एसएस राजामौली दिग्दर्शित 'RRR' हा चित्रपट 2022 च्या सुपरहिट चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटात इंग्रजांनी भारतावर केलेले अत्याचार दाखवले असले तरी त्यात मैत्रीची अतूट झलक पाहायला मिळते. भीम (ज्युनियर एनटीआर) आणि राम (राम चरण) यांच्यात घट्ट मैत्री दिसते. दोघेही एकत्र राज्यकर्त्यांविरुद्ध स्वातंत्र्यासाठी लढताना दिसतात.


महत्वाच्या बातम्या :