Deepak Kesarkar on Uddhav Thackeray : शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी शिवसेनेचे (Shivsena) भाजपसोबत (BJP) संबंध का तुटले, याबाबत गौप्यस्फोट केला आहे. पंतप्रधान मोदींसोबत (PM Narendra Modi) असलेले संबंध जपण्याला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची तयारी होती, पण नारायण राणे (Narayan Rane) यांना केंद्रीय मंत्रिपद दिल्यानं ठाकरे नाराज झाले आणि संबंध बिघडले, असा गौप्यस्फोट दीपक केसरकरांनी केला आहे. आदित्य ठाकरेंची (Aaditya Thackeray) बदनामी झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा त्याग करायचं ठरवलं होतं, असंही केसरकरांनी सांगितलं. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि इतर आमदार कुटुंबप्रमुख उद्धव ठाकरेंना भाजपसोबत युती करण्यासाठी तयार करण्याचे प्रयत्न सुरु होते.
'भाजप आणि शिवसेनेत बोलणी सुरु असताना भाजपच्या 12 आमदाराचं निलंबन झालं. यामुळे भाजप आणि शिवसेनेतील संबंध बिघडले. यानंतर नारायण राणेंचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश झाला. यावर उद्धव ठाकरे नाराज झाले. त्यामुळे अनेक शिवसेना कार्यकर्तेही नाराज झाले. राणे यांनी आदित्य ठाकरेंवर गंभीर आरोप करत त्यांची बदनामी केली. भाजप आणि शिवसेनेतील संबंध सुधारण्याची उद्धव ठाकरेंची तयारी होती. पण नंतरच्या काळात वेळेअभावी ते झालं नाही आणि संबंध आणखी बिघडले', असं केसरकरांनी सांगितलं.
केसरकरांनी सांगितलं की, 'एकनाथ शिंदेसह इतर आमदार भाजपसोबत युती करण्यासाठी तयार होते. यासाठी उद्धव ठाकरेंकडे मागणीही केली होती. मात्र, त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं.' त्यानंतर शिंदे गट गुवाहटीला पोहोचल्यावरही शिवसेना आणि भाजपमध्ये बोलणी सुरु होती. एकनाथ शिंदे यांना बाजूला ठेवून भाजपसोबत युती करण्याला उद्धव ठाकरेंची तयार होती, असा गौप्यस्फोटही केसरकरांनी यावेळी केला. पण भाजपला हे मान्य नव्हतं. याशिवाय शिवसेना आमदारांनाही हे मान्य नव्हतं. त्यानंतर महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप आला हे आपल्याला माहित आहे, असंही केसरकर म्हणाले.
शिवसेना राहिली पाहिजे असं आमचं मत आहे मात्र कार्यकर्त्यांच्या भावना भडकावणं योग्य नाही, एकनाथ शिंदे दोन नंबरचे नेते, अशा नेत्याला बाजूला ठेवणं योग्य नव्हतं. एकनाथ शिंदे सातत्यानं बोलत होते, भाजपसोबत जाऊ पण ते झालं नाही म्हणून शिंदे गट अखेर बाहेर पडला, असं केसरकरांनी सांगितलं.
महत्त्वाच्या इतर बातम्या
- Maharashtra Cabinet : मंत्रिमंडळ विस्तार का होत नाही? समोर आलं महत्वाचं कारण
- Congress Protest in Kolhapur : कोल्हापूरमध्ये काँग्रेसचा केंद्र सरकारविरोधात एल्गार, मोदी सरकार चलेजावच्या दिल्या घोषणा
- Satej Patil on Dhananjay Mahadik : आता सतेज पाटलांकडूनही धनंजय महाडिकांना जोरदार प्रत्युत्तर! म्हणाले, जिल्ह्याच्या राजकारणात..