Food : आजकालच्या धकाधकीच्या जीवनात स्वत:ला फीट ठेवणे अत्यंत गरजेचं आहे. कारण बदलत्या जीवनशैलीमुळे, जंक फूडचे सेवन आणि व्यायाम करण्यास वेळ न मिळणे अशा अनेक गोष्टींमुळे अनेकांचे वजन वाढलंय. निरोगी आरोग्यासाठी वजन नियंत्रणात ठेवणेही आवश्यक आहे. चांगल्या आरोग्यासाठी संतुलित आहार घेणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. चांगला आहार तुम्हाला मानसिक आरोग्यापासून शारीरिक आरोग्यापर्यंत सर्व गोष्टींमध्ये मदत करू शकतो. असे अनेक खाद्यपदार्थ आहेत, ज्यात भरपूर जीवनसत्त्वे आणि खनिजे आहेत आणि ते खाल्ल्याने अनेक आरोग्य फायदे होऊ शकतात. त्यातील महत्त्वाचा अन्नपदार्थ म्हणजे अंकुरित मूग डाळ (मूग स्प्राउट्स) हा एक आहे.
स्प्राउट्स आरोग्यासाठी अत्यंत चांगले
दिवसाची सुरुवात हेल्दी ब्रेकफास्टने केल्याने तुम्हाला दिवसभर ऊर्जा मिळते. यासाठी अनेकजण सकाळी उठून अंकुरित कडधान्यं खातात. स्प्राउट्स खाणे आरोग्यासाठी खूप चांगले मानले जाते. कोंब आलेल्या कडधान्याचे अनेक प्रकार आहेत, पण आज आपण मुगाच्या बनवलेल्या स्प्राउट्सबद्दल बोलत आहोत. या अन्नपदार्थात प्रथिनांचे प्रमाण जास्त असते. याशिवाय, इतर पोषक तत्वांचा खजिना देखील आहे. आपल्या आहारात अंकुरलेली मूग डाळ समाविष्ट केल्याने कोणते आरोग्य फायदे आहेत ते जाणून घेऊया.
दिवसाची सुरुवात निरोगी आणि ताजीतवानी
न्याहारीमध्ये स्प्राउट्सचा समावेश केल्यास दिवसाची सुरुवात निरोगी आणि ताजीतवानी होते. ते वेगवेगळ्या प्रकारे खाल्ले जाऊ शकतात, जसे की सॅलडमध्ये, सँडविचमध्ये किंवा साध्या. स्प्राउट्स खाणे हा पौष्टिक नाश्ता आहे. नाश्त्यात स्प्राउट्स खाण्याचे अनेक फायदे होऊ शकतात. स्प्राउट्समध्ये भरपूर पोषक असतात आणि ते आरोग्यासाठी अनेक प्रकारे फायदेशीर असतात.
अंकुरलेले मूग खाण्याचे फायदे
पोषक तत्वांनी समृद्ध
स्प्राउट्समध्ये जीवनसत्त्वे असतात. विशेषत: व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन के यामध्ये मुबलक प्रमाणात आढळतात. याशिवाय अंकुरलेल्या मूग डाळीमध्ये लोह, मॅग्नेशियम, फॉस्फरस, प्रथिने आणि फायबर यांसारखे खनिजे देखील असतात, जे आरोग्यासाठी खूप चांगले मानले जातात.
पचन सुधारणे
अंकुरलेल्या मूगमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते, जे पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करते. बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यासाठीही हा पदार्थ फायदेशीर मानला जातो.
रोगप्रतिकारक शक्ती वाढवते
स्प्राउट्समध्ये असलेले व्हिटॅमिन सी आणि इतर अँटीऑक्सिडंट्स रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करतात आणि शरीराला रोगांशी लढण्यासाठी शक्ती देतात. कोंब खाल्ल्याने अनेक आजारांशी लढण्यास मदत होते.
वजन कमी करण्यास मदत करते
स्प्राउट्समध्ये कॅलरीज कमी असतात आणि फायबर जास्त असते, ज्यामुळे भूक कमी होते आणि वजन कमी होण्यास मदत होते. ज्या लोकांना वजन कमी करायचे आहे त्यांनी या पदार्थाचा आहारात समावेश करावा.
हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले
स्प्राउट्समध्ये असलेले अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर हृदयाला निरोगी ठेवतात. हे कोलेस्ट्रॉलची पातळी देखील नियंत्रित करते आणि रक्तदाब सामान्य ठेवते.
रक्तातील साखर नियंत्रण
स्प्राउट्स खाल्ल्याने शरीरातील रक्तातील साखरेची पातळी योग्य राखण्यास मदत होते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी हा पदार्थ अतिशय फायदेशीर मानला जातो.
त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर
स्प्राउट्समध्ये व्हिटॅमिन ए, सी आणि सिलिका सारखे घटक असतात, जे त्वचा चमकदार आणि केस निरोगी ठेवण्यासाठी फायदेशीर असतात.
हेही वाचा>>>
Food : 'वेट लॉस'ची चिंता सोडून द्या! 'हे' 5 हाय प्रोटीन-लो कॅलरी स्नॅक्स करतील मदत, अवघ्या काही मिनिटातच तयार होणाऱ्या रेसिपी
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )