मुंबई : बघता बघता 2024 सालाचे पाच महिने उलटले आहेत. आता जून महिना चालू झाला आहे. गेल्या महिन्यात राहिलेली कामे या महिन्यात करण्यासाठी तुम्ही नियोजन आखले असेल. याच कामांत तुमची बँकेशी निगडित काही कामे असतील तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. या महिन्यात एकूण दहा दिवस बँका बंद (June Month Bank Holiday) असणार आहेत. त्यामुळे बँकेच्या या सुट्ट्या लक्षात घेऊनच तुम्ही तुमचे नियोजन करायला हवे. अन्यथा ऐन वेळी तुमची फजिती होऊ शकते.
जून महिन्यात किती दिवस बँका बंद
जून महिन्यात बँका एकूण दहा दिवस बंद आहेत. यात एकूण पाच रविवार आणि दोन शनिवार आहेत. बँकांना जून महिन्यातील पहिली सुट्टी ही दोन जून रोजी असेल. कारण दोन जूनला रविवार आहे. त्यानंतर 15 जून रोी रज संक्रांतीनिमित्त देशाच्या काही भागांत बँका बंद असतील. 17 जून रोजी बकरी इद आहे. त्यामुळे या दिवशी संपूर्ण देशात बँका बंद असतील. जम्मू आणि श्रीनगर ममध्ये बकरी ईदच्या निमित्ताने दोन दिवसांची सुट्टी असते. त्यामुळे तेथे 18 जून रोजीदेखील बँक बंद असणार आहे
जूनमध्ये कोणत्या दिवशी बँका बंद, जाणून घ्या लिस्ट
2 जून- रविवार असल्यामुळे बँका बंद 8 जून - दुसरा शनिवार असल्यामुळे बँका बंद9 जून -रविवार असल्यामुळे बँका बंद15 जून- रज संक्रांतीमुळे आइजवल-भुवनेश्वर येथे बँका बंद16 जून - रविवार असल्यामुळे बँका बंद17 जून - बकरी ईद असल्यामुळे सर्व बँका बंद18 जून बकरी ईदमुळे जम्मू-श्रीनगरमध्ये बँका बंद22 जून- चौथा शनिवार असल्यामुळे बँका बंद23 जून- रविवार असल्यामुळ बँका बंद 30 जून - रविवार असल्यामुळे बँका बंद
शेअर बाजारही तीन दिवस असेल बंद
या काळात बँका बंद असल्या तरी ग्राहकांकडे ऑनलाईन बँकिंगचा पर्याय असणार आहे. ग्राहक नेट बँकिंग तसेच फोन बँकिंगच्या मदतीने आपले व्यवहार करू शकतात. दुसरीकडे जून महिन्यात एकूण अकरा दिवस शेअर बाजार बंद असणार आहे. या महिन्यात एकूण 10 दिवस शनिवार आणि रविवार आहे. तसेच 17 जून रोजी बकरी ईदमुळे शेअर बाजार बंद असेल.
हेही वाचा :
'हे' महत्त्वाचे काम करण्याची शेवटची संधी; नाहीतर कापला जाणार अतिरिक्त टीडीएस!
जून महिन्यात शेअर बाजार सलग तीन दिवस बंद, शेअर्स खरेदी-विक्री करता येणार नाहीत; कारण काय?