पुणे : पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात रोज (Pune Porsche Car Accident) नवनवे खुलासे समोर येत आहे. मात्र अनिश अवधिया आणि आश्विनी कोस्टा या दोघांचा मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबियांची काय अवस्था आहे. यासंदर्भात कोणीही साधी विचारणा करताना दिसत नाही आहे. त्यातच आमच्या मुलाला अग्निदेण्यापूर्वीच आरोपी मुलाला जामीन मिळणं, हे धक्कादायक असल्याचं अनिशच्या कुटुंबियांनी सांगितलं. शिवाय अनिशने दुबईहून आणलेले गिफ्ट न देतात त्याचा असा दुर्दैवी अंत झाला, असं म्हणट कुटुंबियांनी अनिशच्या हकनाक जाण्याचं दु:ख व्यक्त केलं. 


अपघाताच्या चार दिवसांपूर्वी अनिश हा दुबईला गेला होता. त्याच्या ऑफिसने त्याला दुबईत कामासाठी पाठवलं होतं. त्यावेळी तो दुबईतील मित्र मैत्रिणींनादेखील भेटला. दुबईहून त्याने आपल्या आई, वडिल आणि भावासाठी गिफ्ट आणले होते. दुबईहून अनिश घरी न जाता थेट पुण्यात आला. अनिश हा मुळचा मध्यप्रदेशमधील उमरिया जिल्ह्याचा आहे. जेव्हा घरी जाऊ तेव्हा आपण सगळे गिफ्ट्स आई, वडिलांना देऊ, असं त्यानं ठरवलं होतं. मात्र नियतीचं चक्र फिरलं आणि 19 मेला रात्री त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. गिफ्ट न देताच माझा मुलगा सोडून गेला, असं अनिशच्या आईनं सांगितलं. अनिशचं हसतं खेळतं घर अनिशच्या जाण्याने पूर्ण शांत झालं आहे. 


अनिशच्या आईचा ब्रेन ट्यूमर डिटेक्ट झाला होता. साधारण दोन महिन्याभरापूर्वी यासंदर्भात अनिशला कळलं होतं. त्यामुळे त्याला आईची सतत काळजी वाटत राहायची. त्यामुळे तो आईला जास्त जपत होता. साधारण4 मेला तो गावी जाऊन आला होता. आई वडिलांची भेट घेऊन आला होता. त्याच्या आई वडिलांच्या लग्नाचा वाढदिवस होता. त्यासाठी तो गावी गेला होता. त्यानंतर तो दुबईला गेला. हित भेट त्याची आणि त्याच्या कुटुंबियाची शेवटची भेट ठरली. 


अनिशला अनेक गोष्टींची आवड होती. मात्र त्याला घडाळ्यांची जास्त आवड होती. त्यासोबत तो स्केचिंगदेखील करायचा. आपल्या लहान भावाला चांगल्यानं सांभाळायचा. अनिश दादा गेल्यानं त्याच्या लहान भावाला मोठा धक्का बसला आहे. अनिशच्या अशा मृत्यूनं संपूर्ण कुटुंबियांना धक्का बसला आहे. या प्रकरणानंतर साधं विचारणा करायला पोलीस यंत्रणा किवा राजकारणी आलं नसल्याची खंत कुटुंबियांनी व्यक्त केली आहे. 


इतर महत्वाची बातमी-


Pune Porsche Car Accident: गायब झालेल्या अल्पवयीन मुलाच्या आईला गुन्हे शाखेकडून अटक; आज न्यायालयासमोर करणार हजर