Inverter : सध्याच्या काळात बहुतेक बऱ्याच घरात इन्व्हर्टरचा (Inverter) वापर केलेला दिसतो. विशेषत: कोरोना (Covid-19) काळानंतर बहुतेकांचं वर्क फ्रॉम होम सुरु होतं. या काळात इन्व्हर्टरचा वापर फारच वाढू लागला. अचानक लाईट्स गेले की, कामाचा खोळंबा होऊ नये म्हणून हे डिव्हाइस मदतीला येते. पण, आवश्यक ती देखभाल न केल्यामुळे इन्व्हर्टरमध्ये स्फोट होण्याच्या घटना देखील घडतात. नुकतीच उत्तर प्रदेशातील फिरोजाबाद येथे इन्व्हर्टरमुळे घरात लागलेल्या भीषण आगीत तब्बल सहा जणांचा होरपळून मृत्यू झाला. म्हणूनच या महत्वाच्या डिव्हाइसची काळजी घेणे देखील आवश्यक आहे. तुम्या घरातील इन्व्हर्टरची कशी काळजी घ्याल यासाठी आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत. 


इन्व्हर्टरची देखभाल करायची झाल्यास यात सर्वाधिक महत्वाची आहे ती म्हणजे इन्व्हर्टरची बॅटरी. इन्व्हर्टरच्या चांगल्या कामगिरीमध्ये त्याची बॅटरी हा एक महत्त्वाचा भाग आहे. ही बॅटरी घरातील स्टील कोटेड डबल डोअर रेफ्रिजरेटर किंवा काळ्या चमकदार मायक्रोवेव्हसारखे डेकोरेटिव्ह नसले तरी, वीज गेल्यावर उपयोगी पडणारे महत्वाचे उपकरण आहे.


इन्व्हर्टरची योग्य ती काळजी घेतल्यास त्यामध्ये स्फोट होण्यासारख्या गंभीर घटना टाळता येतात. तसेच, इन्व्हर्टरची बॅटरीही दीर्घकाळ चालते.


इन्व्हर्टरची कशी काळजी घ्याल? 


हवेशीर जागा वापरा : इन्व्हर्टर बसवण्यासाठी नेहमी हवेशीर जागा वापरा. इन्व्हर्टर बॅटरी चार्जिंग आणि ऑपरेशन दरम्यान गरम होते. अशा वेळी, हवेशीर जागेमुळे बॅटरी गरम होण्यासारख्या समस्या येतात.


बॅटरी नियमितपणे वापरा : इन्स्टॉलेशन नंतर बॅटरी नियमितपणे वापरत राहणे गरजेचे आहे. यामुळे त्यातील सातत्यता टिकून राहते.     


बॅटरी डिस्चार्ज करा : तुमच्याकडे लाईट्स जाण्याचे प्रमाण कमी असले तरीही, महिन्यातून एकदा बॅटरी पूर्णपणे डिस्चार्ज करा आणि नंतर ती रिचार्ज करा.


बॅटरीची पाण्याची पातळी मोजा : इन्व्हर्टरच्या उत्तम कामगिरीसाठी बॅटरीची पाण्याची पातळी दर दोन महिन्यांनी मोजणे आवशयक आहे. पाण्याची पातळी कमाल आणि किमान पाणी पातळी दरम्यान असावी याची खात्री करा.


बॅटरी नेहमी टॉप अप करा : तुमची बॅटरी डिस्टिल्ड वॉटरने बॅटरी नेहमी टॉप अप करा. बॅटरी स्वच्छ करताना नळाचे पाणी किंवा पावसाचे पाणी वापरू नका. कारण या पाण्यात असुद्धीचे प्रमाण जास्त असते. त्यामुळेतुमची बॅटरी लवकर खराब होऊ शकते. 


महत्त्वाच्या बातम्या : 


Mosquito : डासांना मारणाऱ्या मॉस्किटो किलर केमिकलमध्ये नेमके काय असते? 'या' लिक्विडचा केला जातो वापर