Hingoli Shivsena News : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांवरुन शिवसेना (Shivsena) आक्रमक झाली आहे. सध्या शेतकऱ्यांकडून वीज बिल वसुली सुरु आहे. याविरोधात हिंगोली (Hingoli) जिल्ह्यात शिवसेनेच्या वतीनं ठिय्या आंदोलन करण्यात आलं. वीज बिल वसुली थांबवावी, त्वरीत विजपुरवठा सुरळीत (Electricity supply) करावा यासाठी हिंगोलीत महावितरण कार्यालयासमोर शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या वतीनं ठिय्या आंदोलन करण्यात आलं. यावेळी शिवसैनिकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.


हिंगोलीत शिवसेनेच्या वतीन महावितरण अधिक्षक अभियंता यांच्या कार्यालयासमोरच ठिय्या आंदोलन सुरु केले आहे.  महावितरणच्या वतीनं जिल्ह्यात सध्या सक्तीनं वीज बिल वसुली सुरू आहे आहे. ही वसुली तत्काळ थांबवावी आणि वीजपुरवठा सुरळीत करावा यासह अन्य मागण्यांसाठी हे ठिय्या आंदोलन करण्यात आलं. यावेळी जिल्ह्यातील गायरान जमिनीवरील अतिक्रमण काढण्याच्या निर्णयाला स्थिगिती देण्यात यावी. शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा करावा असा मागण्याही करण्यात आल्या. शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख विनायक भिसे आणि जिल्हा प्रमुख संदेश देशमुख यांच्यासह अनेक शिवसैनिकांसह मोठ्या संख्येनं शेतकरी या आंदोलनात सहभागी झाले होते.


राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी


यावेळी आंदोलकांनी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या राज्य सरकारचा करायचं काय खाली डोक वर पाय अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. तसेच भाजपच्या विरोधातही जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. याचबरोबर जय भवानी, जय शिवाजी असा जयघोष देखील यावेळी आंदोलकांनी केल्याचं पाहायला मिळालं. यावेळी या आंदोलनात शिवसैनिकांबरोबर मोठ्या संख्येनं शेतकरी देखील सहभागी झाले होते. आंदोलनात सहभागी झालेल्या सर्व शिवसैनिक आणि शेतकऱ्यांचे आभार मानन्यात आले. 


वीज तोडणीवरुन अंबादास दानवेंचा सरकारवर निशाणा


सध्या शेतकऱ्यांना पीकं वाचवण्यासाठी विजेची गरज आहे. पण जबरदस्तीनं शेतकऱ्यांची वीज तोडणी केली जात असल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी केला होता. मंगळवारी दानवे यांनी पत्रकार परिषद घेतली होती. या परिषदेत त्यांनी वीज तोडणीच्या मुद्यासह अन्य शेतकरी प्रश्नावरुन सरकारला लक्ष केलं होतं. हे सरकार शेतकऱ्यांवर जबरदस्ती करत आहे. शेतकऱ्यांना अजूनही पीक विमा (Crop Insurance) मिळत नाहीत. विमा कंपन्या शेतकऱ्यांचा टाळूवरचं लोणी खात असल्याचे दानवे म्हणाले. त्यामुळं शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी शिवसेना रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा अंबादास दानवेंनी यावेळी दिला. दानवेंच्या इशाऱ्यानंतर आज हिंगोलीत शिवसैनिक रस्त्यावर उतरल्याचे पाहायला मिळाले. यावेळी आंदोलकांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.


महत्त्वाच्या बातम्या:


Ambadas Danve : जबदस्तीनं शेतकऱ्यांची वीज तोडणी सुरु, दावनेंचा सरकारवर हल्लाबोल, शिवसेना रस्त्यावर उतरणार