Fitness Tips : एका ठराविक वयानंतर स्नायूंचं दुखणं वाढत जातं. अशा वेळी स्नायूंमध्ये अचानक तीव्र वेदना खूप वेदनादायक असू शकतात, त्याचा परिणाम तुमच्या दैनंदिन जीवनावरही होतो. स्नायूंचा ताण किंवा दुखापत होणे यांसारख्या अनेक समस्या असू शकतात, ज्यामुळे स्नायूंमध्ये वेदना होऊ शकतात. द योगा इन्स्टिट्यूटचे संचालक आणि योगगुरू डॉ. हंसाजी योगेंद्र सांगतात की, नियमितपणे योगा (Yoga) केल्याने स्नायू निरोगी राहतात.


तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, शरीर आणि मन निरोगी राहण्यासाठी नियमित योगा फार फायदेशीर आहे. कोअरपासून हॅमस्ट्रिंगपर्यंत, या स्नायूंच्या समस्या टाळण्यासाठी योगाभ्यास खूप फायदेशीर ठरू शकतात. पण, अशी कोणती योगासनं आहेत जी तुमचे स्नायू निरोगी ठेवण्यास मदत करू शकतात? याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.  


बालासना


हे पाठ, नितंब, मांड्या आणि घोट्याच्या स्नायूंना ताणते. बालासन केल्याने स्नायूंमधील ताण दूर होतो. या आसनात पाठीचा कणा ताणल्यामुळे डिस्क्स आणि नसा यांच्यावरील दाबापासून आराम मिळतो.


हे आसन कसे कराल?



  • पाय वाकवून वज्रासनाच्या आसनात बसा.

  • आपल्या टाचांवर बसून आणि चटईवर आपले कपाळ ठेवा, हळूहळू आपले धड पुढे वाकवा.

  • 30 सेकंद ते 1 मिनिटं या आसनात राहा.


शवासन


या आसनामुळे शरीराला संपूर्ण आधार मिळतो, ज्यामुळे स्नायू पूर्णपणे आराम करू शकतात आणि तणावमुक्त होऊ शकतात. हे आसन डायाफ्रामॅटिक श्वासोच्छ्वास सुलभ करते. ज्यामुळे मन शांत ठेवण्यास उपयोग होतो. 


हे आसन कसे कराल?



  • आपले पाय वेगळे ठेवून झोपा.

  • दोन्ही हात आरामात खाली ठेवा आणि तळवे वरच्या दिशेला ठेवा.

  • आपले डोळे बंद करा आणि शरीराला सैल सोडा. 

  • कोणत्याही प्रकारचा स्नायूंचा ताण टाळा.

  • 5-10 मिनिटे या आसनात राहा.


इतर उपाय


बर्फ आणि उष्णता उपचार : जर तुमच्या स्नायूंमध्ये फार वेदना होत असतील तर अशा प्रभावित भागावर बर्फ पॅक किंवा हीटिंग पॅड लावल्याने स्नायूंची सूज कमी होण्यास मदत होते. याशिवाय भरपूर पाणी प्या. हे स्नायू क्रॅम्पपासून तुमची सुटका करण्यास मदत करतात.  


(टिप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे शरीराच्या कोणत्याही समस्येवर कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.)


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Coconut Water : उच्च रक्तदाबाच्या रूग्णांनी नारळ पाण्याचं सेवन करावं की करू नये? वाचा तज्ज्ञांचा सल्ला