Horoscope Today 19 February 2024 : राशीभविष्यानुसार, आज म्हणजेच 19 फेब्रुवारी 2024, सोमवार हा महत्त्वाचा दिवस आहे. आजचा दिवस काही लोकांसाठी चांगले तर काहींसाठी वाईट परिणाम आणू शकतो. आज तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही? आज तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावे लागेल किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात? कर्क, सिंह, कन्या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस व्यवसाय, आरोग्य, नातेसंबंध आणि प्रेमासाठी किती खास असणार आहे? आजचे राशीभविष्य जाणून घ्या...
कर्क (Cancer Horoscope Kark Rashi Today)
कर्क राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कौटुंबिकदृष्ट्या महत्त्वाचा असेल. आज वडिलांची तब्येत बिघडली असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. नोकरीच्या शोधात असलेल्या लोकांना काही चांगली बातमी मिळू शकते. वाईट विचार तुमच्या मनात येऊ देऊ नका, अन्यथा समस्या उद्भवू शकतात. राजकारणाशी संबंधित लोकांना आजूबाजूच्या लोकांवर विश्वास ठेवणं टाळावं लागेल. आज काही लोकांना पैशाची समस्या असेल, तर काहींना आर्थिक लाभ होईल. तुमचं जोडीदाराव्यतिरिक्त इतर कोणाकडे तरी आकर्षण राहील. तुमच्या चुकीच्या पावलांचा परिणाम नातेसंबंधांवर होईल, त्यामुळे सावध राहा.
सिंह (Leo Horoscope Singh Rashi Today)
विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळेल. नोकरीच्या ठिकाणी मोठे बदल होतील. आर्थिक स्थिती मजबूत होईल. जमीन आणि वाहन खरेदीचा निर्णय होऊ शकतो. आज तुम्हाला धार्मिक कार्यात रस असेल, परंतु तुमच्या मूडमध्ये चढ-उतार जाणवेल, ज्यामुळे तुम्हाला समस्यांना सामोरं जावं लागू शकतं, त्यामुळे भावनेच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका. धीर धरा. आज वडिलोपार्जित मालमत्तेतून आर्थिक लाभ होईल. ऑफिसमध्ये वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. नोकरीत बढतीची शक्यता आहे. वाहनाच्या देखभालीवर पैसे खर्च होऊ शकतात.
कन्या (Virgo Horoscope Kanya Today)
कामामुळे जास्त ताण घेऊ नका. नातेसंबंध सुधारतील, परंतु रागावर नियंत्रण ठेवा, स्वतःवर नियंत्रण ठेवा. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील आणि संपत्ती वाढेल. अभ्यासात तुमची प्रगती दिसेल. आज उत्पन्न कमी आणि खर्च जास्त असल्यामुळे मन अस्वस्थ राहू शकतं. व्यावसायिक जीवनात जबाबदाऱ्या वाढतील. स्वभावात चिडचिडेपणा राहील. भावनिक होऊन कोणताही निर्णय घेऊ नका. आज तुम्हाला कामानिमित्त प्रवास करावा लागू शकतो.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :