Coconut Water : हिवाळ्याचा (Winter Season) ऋतू हळूहळू संपत चालला असून हळूहळू उन्हाळ्याची (Summer) चाहूल लागायला सुरुवात झाली आहे. या ऋतूमध्ये बहुतेक लोकांना लिंबू पाण्याबरोबरच नारळ पाणीदेखील प्यायला आवडतं. उन्हाळ्यात नारळाचे पाणी पिण्याचा सल्लाही आरोग्य तज्ज्ञ देतात. पण ज्यांना उच्च रक्तदाबाची समस्या आहे ते नारळ पाणी (Coconut Water) पिऊ शकतात का? असा अनेकदा प्रश्न पडतो. 


खरंतर नारळाचे पाणी उर्जेने परिपूर्ण असते. हे पाणी प्यायल्याने आपल्या पोटातही थंडावा राहतो. तसेच, हे पाणी प्यायल्याने शरीरात इलेक्ट्रोलाईट्स संतुलित राहतात. नारळाचे पाणी शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्याचे काम करतात. नारळ पाण्याचे इतके फायदे असताना मात्र, उच्च रक्तदाब असणाऱ्या लोकांनी नारळ पाण्याचे सेवन करावं का? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. याच संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात. 


उच्च रक्तदाबाचे रुग्ण नारळ पाणी पिऊ शकतात का?


ज्या लोकांना उच्च रक्तदाबाची समस्या आहे अशा लोकांनी नारळ पाणी नक्की प्यावे. अनेक वेळा आहारातून शरीराला योग्य प्रमाणात पोटॅशियम मिळत नाही, असे आरोग्य तज्ज्ञ म्हणतात. हे सोडियम आणि लोह मूत्राद्वारे काढून टाकण्यास मदत करते. हे प्यायल्याने रक्तदाब नियंत्रणात राहतो.


नसा स्वच्छ होतात 


नारळ पाणी सर्वांसाठी फायदेशीर मानले जाते. नारळ पाणी प्यायल्याने आपले रक्ताभिसरण सुरळीत राहते. तसेच, कोलेस्ट्रॉलच्या समस्येपासून मुक्त राहतो. नारळ पाणी प्यायल्याने शरीरातील शिरा साफ होतात. तसेच, ज्या लोकांना LDL म्हणजेच खराब कोलेस्ट्रॉलची समस्या आहे त्यांनी नारळाच्या पाण्याचं सेवन नक्की करावं. याशिवाय हाय बीपीच्या रुग्णांची सोडियमची पातळी वाढते. नारळ पाणी प्यायल्याने शरीरातील सोडियमची पातळी नियंत्रित राहते.


किती प्रमाणात पाणी प्यावे? 


हायपरटेन्शन म्हणजेच रक्तदाब वाढल्यास एक ग्लास नारळ पाणी पिणे चांगले मानले जाते. तज्ज्ञांच्या मते, आठवड्यातून 2 ते 3 दिवस नारळ पाणी पिणं शरीरासाठी चांगलं आहे. सकाळी रिकाम्या पोटी हे पिणे आणखी फायदेशीर ठरू शकते. पण तुम्ही कोणत्याही प्रकारचे औषध घेत असाल तर डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय नारळ पाण्याचं सेवन करू नका. अशा वेळी नारळ पाणी पिणे टाळा.


(टिप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे शरीराच्या कोणत्याही समस्येवर कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.)


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Honey For Dark Circles: डोळ्यांखाली मोठमोठे डार्क सर्कल्स आलेत? मधासोबत 'हे' 3 पदार्थ एकत्र करा अन् जादू पाहा!