(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Weight Loss : चाळीशीनंतर महिलांचे वजन का वाढते? फिट राहण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या टिप्स...
Diet After 40 Age : वाढत्या वयानुसार, फिटनेसकडे लक्ष देणे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. विशेषत: स्त्रियांनी आपला आहार आणि व्यायामाकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
Diet After 40 Age : वाढत्या वयानुसार शरीरात अनेक बदल जाणवतात. तसेच, शरीरात पौष्टिकतेची कमतरताही भासू लागते. विशेषत: वयाच्या चाळीशीनंतर महिलांच्या शरीरात अनेक प्रकारची जीवनसत्त्वे आणि खनिजांची कमतरता भासू लगाते. वृद्धापकाळात फिटनेस टिकविण्यासाठी व्यायाम आणि चांगला आहार हाच एकमेव मंत्र आहे. चाळीशीनंतर शरीराच अनेक प्रकारचे बदल होतात. महिलांच्या हार्मोन्समध्येही बदल दिसून येतो. आपले चयापचय खूप मंद होते. ऊर्जा कमी होते आणि गोड खाण्याची जास्त इच्छा होते.
चाळीशीनंतर वजन का वाढते?
वयानुसार चयापचय खूप मंद होते. वर्कआउट करतानाही, तुम्ही वयाच्या तिशीत करू शकलेल्या कॅलरीज बर्न करत नाही. अनेक वेळा व्यायाम करूनही महिलांच्या पोटावर चरबी चढू लागते. या वयात महिलांचे वजन कमी न होण्यामागे रजोनिवृत्ती (Monopose) हे देखील प्रमुख कारण आहे. या वयात, महिला हायपरथायरॉईडीझमच्या बळी होतात. ज्यामुळे वजन कमी करणे कठीण होते.
रोज व्यायाम करणे आवश्यक
चाळीशीनंतर रोज किमान 30 मिनिटांचा जरी तुम्ही व्यायाम केला तरी तुमचे शरीर निरोगी राहण्यास मदत होते. व्यायामामुळे तुम्हाला ऊर्जा मिळते. व्यायाम केल्याने तुमचे वजन कमी होते आणि शरीरात लवचिकता टिकून राहते. नियमित व्यायाम केल्याने तुम्ही दीर्घकाळ तरूण राहू शकता.
आहाराकडे लक्ष द्या :
वाढत्या वयात तुम्ही तुमच्या आहाराकडे सर्वाधिक लक्ष देणे गरजेचे आहे. यासाठी बदाम, अक्रोड, भोपळ्याच्या बिया, सूर्यफुलाच्या बिया यांसारख्या बियांचा आहारात समावेश करावा. अन्नामध्ये प्रथिनांचे प्रमाण वाढवा. नियमित व्यायाम करा. फायबर युक्त सब्जाचा आहारात समावेश करा. जर शरीरात कोणत्याही जीवनसत्वाची किंवा खनिजांची कमतरता असेल तर त्यामध्ये भरपूर पूरक आहार घ्या. अन्नातील खाद्यपदार्थ कमी करा. आहारात संपूर्ण धान्य, संपूर्ण मसूर, फळे आणि भाज्यांचा अधिक समावेश करा. फिटनेस राखण्यासाठी किमान आठ तासांची झोप घ्या.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
महत्त्वाच्या बातम्या :