Fashion : साडी म्हटलं की महिलांचा जीव अडकलेला असतो. कारण तो अगदीच जिव्हाळ्याचा विषय ठरतो. तसा साडी हा सदाबहार फॅशन ट्रेंड राहिला आहे. त्याच्या डिझाईन्ससाठी, महिला बहुतेक सेलिब्रिटींच्या लूक्समुळे प्रभावित होतात. एका विशिष्ट वयानंतर, स्वत:साठी साडी खरेदी करताना कोणत्या प्रकारचे डिझाइन निवडावे? याचा विचार करून महिला अनेकदा गोंधळून जातात. साडी नेसण्यासाठी तुमच्या शरीराचा प्रकार समजून घेऊन प्लीट्स बनवाव्यात. यासाठी तुम्ही सेलिब्रिटींचे लूक फॉलो करू शकता...


 


माधुरी दीक्षितचे स्टायलिश साडीचे लूक्स एकदा पाहाच...


अभिनेत्रींच्या लुक्सबद्दल बोलायचे झाले तर माधुरी दीक्षितला कोण ओळखत नाही, तिची अदा, तिचे नृत्य, तिचा अभिनय, आणि तिच्या स्टाईलचे प्रत्येकजण चाहते आहेत. धक धक गर्लने चित्रपटसृष्टीच्या माध्यमातून अवघ्या जगावर जादू केलीय. वयाची पन्नास वर्ष पूर्ण झाल्यानंतरही माधुरी दिक्षीत अगदी चिरतरूणच दिसत असल्यामुळे अनेक महिलांना तिच्यासारखे कसे दिसता येईल हा प्रश्न पडतो. तर आज आम्ही तुम्हाला या लेखाच्या माध्यमातून सांगतो, माधुरी दिक्षीतच्या  स्टायलिश साडीचे लूकही पुन्हा रिक्रिएट करू शकता. आज आम्ही तुम्हाला अशा साडीचे डिझाइन्स दाखवणार आहोत ज्या तुम्ही विशेषतः वयाच्या 55 ​​वर्षांनंतर घालू शकता. आम्ही तुम्हाला या साडी लुक स्टाईल करण्याच्या सोप्या टिप्स सांगणार आहोत.


 




 


सोनेरी साडी डिझाइन


सोनेरी रंग अतिशय रॉयल लुक देण्यास मदत करतो. ही सुंदर वर्क हेवी साडी डिझायनर नकुल सेन यांनी डिझाइन केली आहे. तुम्हाला या प्रकारची साडी बाजारात 4,000 रुपयांना मिळेल.




ब्लॅक साडी डिझाईन


काळा रंग उत्कृष्ट दिसतो आणि शरीराला परिपूर्ण आकार देण्याचे काम करतो. ही सुंदर चमकणारी साडी डिझायनर गौरव गुप्ता यांनी डिझाइन केली आहे. या प्रकारची साडी तुम्हाला जवळपास 3,000 रुपयांना बाजारात मिळेल.




मल्टीकलर साडी डिझाइन


आजकाल मल्टी-शेड साड्यांचा ट्रेंड खूप आहे. तरुण ताहिलियानी डिझायनरने ही सुंदर साडी डिझाइन केली आहे. या पद्धतीत तुम्हाला घरचोळ्याच्या डिझाइनच्या साड्या पाहायला मिळतील. ब्लाउजसाठी सोनेरी रंग निवडा.


 


 


हेही वाचा>>>


 


Health : वयाच्या पन्नाशीतही इतकी फिट? यामागे काय गुपित? मलायका अरोरा करते 'हे' 5 व्यायाम, जाणून घ्या.


(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )