Rashmika Mandanna : दाक्षिणात्य मनोरंजनसृष्टीसह बॉलिवूड गाजवणारी रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) सध्या चर्चेत आहे. 'नॅशनल क्रश ऑफ इंडिया'चा खिताब रश्मिकाने आपल्या नावे केला आहे. 'पुष्पा' (Pushpa), 'अॅनिमल' (Animal) अशा अनेक सुपरहिट चित्रपटांचा रश्मिका मंदाना भाग आहे. रश्मिका मंदाना नुकतीच मुंबईत आली होती. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या एका गोष्टीचं तिने कौतुक केलं. मीडियाला दिलेल्या मुलाखतीत रश्मिका मंदाना म्हणाली की,"भारताला आता कोणीही थांबवू शकत नाही".  


रश्मिका मंदानाने मुंबई ट्रान्स हार्बर लिंक अटल सेतुचं कौतुक केलं आहे. 12 जानेवारी 2024 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अटल सेतुचं उद्घाटन केलं होतं. अटल सेतु हा मुंबईतील परिवहन नेटवर्कमधील गेमचेंजर ठरला आहे. 'पुष्पा 2' (Pushpa 2) अभिनेत्री रश्मिका मंदानाने याबद्दल भाष्य करताना "भारत कुठेही थांबू शकत नाही", असं म्हटलं आहे. दुसरीकडे रश्मिकाला नेटकऱ्यांनी चांगलच ट्रोल केलं आहे. कन्नड मुलीला महाराष्ट्राचं पडलंय, कौतुक करण्याचे किती पैसे मिळाले, अशा कमेंट्स करत नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलंय. 


रश्मिका मंदाना काय म्हणाली? (Rashmika Mandanna Talks About Mumbai Atal Setu)


अटल सेतुबद्दल (MTHL) बोलताना रश्मिका मंदाना म्हणाली,"2 तासाच्या प्रवासाला 20 मिनिटे लागतात. असं कधी होईल असा कोणी विचार केलेला का? नवी मुंबई ते मुंबई, गोवा ते मुंबई, बंगळुरू ते मुंबईपर्यंतचा प्रवास सोपा झाला आहे. अद्भुत इंफ्रास्ट्रक्चर पाहून मला अभिमान वाटतोय. आता भारत थांबणार नाही. भारतात ही गोष्ट होणार नाही, असं आता कोणीही बोलणार नाही. देशाने गेल्या 10 वर्षात केलेली प्रगती कौतुकास्पद आहे. विकास थांबला नाही पाहिजे. विकासासाठी मतदान करा". 






रश्मिकाच्या आगामी चित्रपटांबद्दल जाणून घ्या... (Rashmika Mandanna Upcoming Movie)


रश्मिका मंदाना लवकरच अल्लू अर्जुनच्या (Allu Arjun) 'पुष्पा 2' (Pushpa 2) या चित्रपटात झळकणार आहे. 15 ऑगस्टला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येईल. रश्मिका मंदाना आता सलमान खानच्या (Salman Khan) 'सिकंदर' चित्रपटात झळकणार आहे. एआर मुरुगदास या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहेत. रश्मिकाच्या या आगामी चित्रपटाची चाहत्यांना आता उत्सुकता आहे. रश्मिका मंदानाने 2016 मध्ये 'क्रिक पार्टी' या चित्रपटाच्या माध्यमातून आपल्या करिअरची सुरुवात केली आहे. रक्षित शेट्टीने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) रिलेशनमध्ये असल्याची सध्या चर्चा आहे. पण अद्याप दोघांनीही याबद्दल अधिकृत माहिती दिलेली नाही.


संबंधित बातम्या


Salman Khan Rashmika Mandanna : नॅशनल क्रश रश्मिकासोबत भाईजानचा रिल लाईफ रोमान्स; पुढच्या ईदला दबंग खानची चाहत्यांना खास ईदी