Fashion : मी मिरवणार आणि सगळ्यांची जिरवणार...! असंच काहीसं चित्र सध्या अंबानीच्या सुनांचं दिसतंय. आज म्हणजेच 12 जुलै रोजी देशातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी त्याची बालपणीची मैत्रीण राधिका मर्चंटसोबत विवाहबंधनात अडकणार आहे. त्याचीच ही सगळी तयारी सुरू असल्याचं दिसत आहे. एकीकडे अवघं बॉलीवूड अभिनेत्री सुंदर पोशाखात लग्नाच्या कार्यक्रमांना पोहोचत असतानाच, दुसरीकडे अंबानी कुटुंबातील महिलाही आपली शाही स्टाईल दाखवण्यात कुणापेक्षा कमी नाहीत. विशेषतः जर आपण याबद्दल बोललो तर, अंबानी कुटुंबातील सून म्हणजेच श्लोका अंबानी आणि भावी सून राधिका मर्चंट यांची शाही शैली पाहण्यासारखी आहे. मोठी गोष्ट म्हणजे या भव्य लग्नातही श्लोका आणि राधिका आपल्या वडिलांनी दिलेले दागिने घालून आपली राजेशाही स्टाईल दाखवत आहेत.
आपली शाही स्टाईल दाखवण्यात कुणापेक्षा कमी नाहीत अंबानींच्या सुना..!
मार्चपासूनच अनंत आणि राधिकाच्या लग्नाचे कार्यक्रम सुरू झाले होते. प्रथम जामनगर विवाहपूर्व सोहळा मार्चमध्ये आयोजित करण्यात आला होता, त्यानंतर क्रूझवर एक भव्य विवाहपूर्व सोहळा आयोजित करण्यात आला होता. जुलै महिन्याच्या सुरुवातीपासूनच लग्नाच्या विधींना सुरुवात झाली आहे. लग्नाच्या विधींमध्ये सहभागी होण्यासाठी बॉलिवूडचे सर्व सेलिब्रिटी अँटिलियाला पोहोचले आहेत. एकीकडे बॉलीवूड अभिनेत्री अतिशय सुंदर पोशाखात कार्यक्रमांना पोहोचत असताना दुसरीकडे अंबानी कुटुंबातील महिलाही आपली शाही स्टाईल दाखवण्यात कुणापेक्षा कमी नाहीत.
श्लोकाचा मेहेंदी लूक
मुकेश अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश अंबानीची पत्नी श्लोका अंबानी तिच्या भावाच्या लग्नाच्या प्रत्येक समारंभात सर्वात सुंदर पोशाख परिधान करताना दिसते. तिचे हे सर्व लूक मोठी बहीण दिया मेहता हिने स्टाईल केले आहेत. अलीकडेच तिने अनंत राधिकाच्या मेहेंदीसाठी सुंदर टिश्यू साडी नेसली होती. या साडीत ती खूपच सुंदर दिसत आहे.
आजीचा सोन्याचा नेकलेस
श्लोकाने दागिने परिधान केल्याने तिची साडी अधिक खास बनली. हा साडी लुक पूर्ण करण्यासाठी तिने आजीचा सोन्याचा नेकलेस घातला होता. या नेकलेसची रचना अतिशय अनोखी आणि सुंदर होती. यासोबतच तिने हातात बांगड्याही घातल्या होत्या, ज्या सुंदर दिसत होत्या.
राधिकाचे मामेरू लूक
राधिका मर्चंटने लग्नापूर्वी आयोजित केलेल्या मामेरू समारंभात सुंदर बंधेज लेहेंगा परिधान केला होता. या सोनेरी आणि गुलाबी लेहेंग्यात राधिका कमालीची सुंदर दिसत होती. या खास लेहेंग्याबद्दल बोलायचे झाले तर राधिकाचा हा घागरा 35 मीटरचा होता. त्यावर दिसणारी एम्ब्रॉयडरी सोन्याच्या जरदोसी लेसने केली होती, त्यामुळे राधिकाचे सौंदर्य वाढले होते.
दागिने खूप खास
राधिकाने या लेहेंगा लूकसोबत तिच्या आईची ज्वेलरी घातली होती. राधिकाने तिची आई शैला विरेन मर्चंट यांचे दागिने या सुंदर बंधेज लेहेंग्यासह परिधान केले होते. राधिकाच्या आईने हा दागिना तिच्या मामेरू फंक्शनमध्ये परिधान केला होता. राधिका तिच्या आईच्या चोकरमध्ये राजकुमारीसारखी दिसत होती, तिच्या कमरेला सोन्याचा कमरपट्टा, मोठे कानातले आणि भारी मांग टिक्का तिच्या सौंदर्यात चार चांद लावत होता.
हेही वाचा>>>
Fashion : गुलाबाची कळी बघा हळदीने माखली..! नववधूंच्या पसंतीस उतरतोय राधिकाचा फुलांचा दुपट्टा! नहळदी लूक खास बनविण्यासाठी 'अशी' घेतली मेहनत
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )